Download App

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वाहू लागलंय प्रेमाचं वारं; कोण पडलंय कोणाच्या प्रेमात?

Bigg Boss Marathi New Season Day 12 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात (Bigg Boss Marathi ) सुरुवातीपासूनच प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत.

Bigg Boss Marathi New Season Day 12 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात (Bigg Boss Marathi ) सुरुवातीपासूनच प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. अरबाज आणि निक्कीची स्ट्राँग मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ शकतं असा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला. त्यानंतर रांगड्या मातीत परदेसी प्रेमाचं रोपटं फुललेलं दिसून आलं. बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) आणि इरिना रूडाकोवा (Irina Rudakova) यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते, असे म्हटले जाऊ लागले. अशातच आता रॅपर आर्या (Rapper Arya) देखील वैभवच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे.


त्यामुळे आर्याचा हार्टब्रेक होणार की वैभव तिचं प्रेम स्वीकारणार? हे येणारा काळच ठरवेल. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये वैभव आणि इरिना मजा-मस्ती करताना दिसत आहेत. दरम्यान वैभव म्हणतो,”कसली क्यूट आहे यार ही”. पण दुसरीकडे आर्या मात्र हार्टब्रेक झाल्याने ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. पुढे वैभव आर्याला विचारतो,”काय विषय आहे नक्की?”. त्यावर आर्या म्हणते,”मला तू नॅचरली अॅटरॅक्टिव्ह वाटतो”. यावर वैभव म्हणतो,”मी तर तुला असं कोणतं इंटेंशन दिलेलं नाही”. पण आर्या म्हणते,”मला होऊ शकतं अॅटरॅक्शन”.

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, सुरज चव्हाण, निखल दामले, निक्की तांबोळी आणि घन:श्याम दरवडे हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सहा सदस्यांमधून या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे पाहावे लागणार आहे.

Bigg Boss Marathi : नॉमिनेशन कार्यात अभिजीत सावंत अन् छोटा पुढारी भिडले; कोण होणार नॉमिनेट?

बिग बॉसच्या घरात घन:श्यामने म्हणजेच छोट्या नेणे आपल्या हजरजबाबीपणाने लोकांची मने जिंकली आहेत. घन:श्याम सध्या अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी यांच्या ग्रुपमध्ये वावरत आहे. पहिल्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये घरात जोरदार वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानंतर आता अंकिता वालावलकर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता कॅप्टन म्हणून वावरणार आहे. दिलेल्या जबाबदाऱ्या ती कशी पूर्ण करणार? कामे वाटताना घरातील सर्व सदस्यांना समान न्याय देईल का? तिला घरातील लोक साथ देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us