Bigg Boss Marathi: बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण पडलाय परदेसी गर्ल इरिनाच्या प्रेमात?

Bigg Boss Marathi: बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण पडलाय परदेसी गर्ल इरिनाच्या प्रेमात?

Bigg Boss Marathi New Season Day 10 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) नव्या सीझनच्या सुरुवातीपासूनच घरात प्रेमाचे वारे वाहू (Bigg Boss Marathi New Season ) लागले आहेत. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलचा बॉन्ड नेटकऱ्यांच्या आणि ‘बिग बॉस’प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. (BB Marathi) अशातच आता आणखी एक प्रेमकहाणी फुलू शकते. रांगड्या मातीत परदेसी प्रेमाचं रोपटं फुलताना दिसून येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) इरिनाचं (Irina Rudakova) वारंवार कौतुक करताना आणि तिला जास्त महत्त्व देताना दिसून येत आहे. प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाला म्हणतोय,”कालपेक्षा जास्त सुंदर दिसतेस. मला तू जास्त महत्त्वाची व्यक्ती असल्याचं फिल होतंय”. त्यावर इरिना ‘हो’ असं उत्तर देते. तर दुसरीकडे जान्हवी वैभवला म्हणते, “फॉरेनची पाटलीन मस्त आहे”. त्यावर निक्की म्हणतेय,”भाई…तुझं काय चाललंय”. बारामतीचा रांगडा गडी अभिनेता वैभव चव्हाण आणि परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा यांच्यात खरंच प्रेम फुलतंय की नाटक आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड पाहावा लागेल.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज पहिला कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ असं या कॅप्टनसी कार्याचं नाव आहे. या टास्कदरम्यान घरात सूरज आणि वैभवमध्ये दोरदार भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. “दम असेल तर मला हात लावून दाखव”, असं वैभव सूरजला म्हणतो. पण इरिना मात्र सूरजला शांत करते.

BB Marathi : आज सुटणार कॅप्टनसीची बुलेट ट्रेन; कोण होणार बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन?

बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये दहाव्या दिवशी पहिलं कॅप्टनसीचा टास्क पार पडणार आहे. यामध्ये वाढत्या स्पर्धेमुळे, प्रत्येकजण आपला वैयक्तिक खेळ सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या एपिसोडमध्ये आता घरातील सदस्यांसाठी स्पर्धा चांगलीच रंगलेली पाहायला मिळत आहे. घराचा कॅप्टन बनण्यासाठी हा टास्क जिंकावा लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube