Bigg Boss OTT 3 Grand Finale Promo: ‘बिग बॉस ओटीटी 3’ (Bigg Boss OTT 3) संपला असून हा कार्यक्रम सगळ्यांना खास आठवणी देऊन गेला आहे. ‘बिग बॉस ओटीटी 3’ च्या एपिसोडमध्ये ‘स्त्री 2’ अभिनेते राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांनी नुकतचं हजेरी लावली असताना त्यांनी होस्ट अनिल कपूरचं (Anil Kapoor) तोंडभरून कौतुक केले आहे. ज्याने रिॲलिटी शोद्वारे होस्टिंगमध्ये पदार्पण केले होते. दोघांनी कपूर यांना ‘सर्वात तरुण आणि योग्य होस्ट’ अस म्हटल असून अनिल कपूरचा फिटनेस आणि लूक हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला.
तत्पूर्वी विकी कौशलने देखील अनिल कपूरच्या शोमध्ये त्यांचा फिटनेससाठी त्यांचं कौतुक केले होत. त्यांनी त्यांच्या चित्रपटातील व्हायरल गाणे ‘तौबा तौबा’ त्यांना समर्पित केले. अनिल कपूर आणि जेरेमी रेनर यांच्यासोबत दिसणारे डॉक्युमेंट-सीरीज ‘रेनरव्हेशन्स’चे निर्माते रोरी मिलिकिन यांनीही अभिनेत्याच्या फिटनेस बद्दल प्रशंसा केली होती.
अनिल कपूरच्या होस्टिंग पदार्पणाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि शोचे रेटिंग हे त्याचे पुरावे आहेत. चित्रपटाच्या आघाडीवर अनिल कपूर ‘सुभेदार’ साठी तयारी करत आहे जे त्याचे दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांच्यासोबतचे पहिले सहकार्य आहे. तो YRF च्या गुप्तचर विश्वात सामील होणार असल्याचीही अफवा आहे.
बिग बॉस ओटीटी 3 होस्ट केला
बिग बॉस ओटीटी 3 चे आयोजन बॉलीवूड सुपरस्टार अनिल कपूर यांनी केले होते. अनिल कपूरला एका एपिसोडसाठी सुमारे 2 कोटी रुपये मानधन मिळाले होते. बिग बॉस ओटीटी 2 सलमान खानने होस्ट केला होता. करण जोहर बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनचा होस्ट होता.
Grand Finale: कोण जिंकणार बिग बॉस ओटीटी 3 ग्रँड फिनालेची उत्सुकता शिगेला
पाच फायनलिस्टच्या कुटुंबीयांची भेट घेतली
बिग बॉस ओटीटी 3 च्या ग्रँड फिनालेला पाचही फायनलिस्टच्या कुटुंबांनी हजेरी लावली होती. यादरम्यान अनिल कपूरने या पाच जणांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यासोबत बिग बॉस ओटीटी 3 चे इतर स्पर्धक देखील बिग बॉस ओटीटीच्या शेवटच्या टप्प्यात सहभागी झाले होते.