Shiv Thakare ED Notice: ‘बिग बॉस’ मुळे (Bigg Boss) प्रकाशझोतात आलेल्या शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दू रोजिक (Abdu Rojik) यांना गुरुवारी ‘ईडी’कडून चौकशीसाठी ( ED Notice) समन्स बजावण्यात आले आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) साक्ष देण्यासाठी या दोघांनाही ‘ईडी’कडून नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. संबंधित प्रकरण ड्रग माफिया अली असगर शिराझीशी संबंधित आहे.
शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना समन्स: ड्रग माफिया अली असगर शिराझीशी संबंधित प्रकरणी टीव्ही अभिनेता शिव ठाकरेला ईडीने समन्स पाठवले आहे. त्याचवेळी अब्दू रोजिक यांनाही याच प्रकरणात साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले आहे. या दोन्ही स्टार्सनी हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत त्यांचे पैसे गुंतवले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही कंपनी ड्रग माफिया अली असगर शिराजीच्या नावावर आहे.
कतरिना कैफच्या ब्युटी ब्रँडने महिला प्रीमियर लीग यूपी वॉरिअर्ससोबत केलं अनोखं कॉलब्रेशन
शिव आणि अब्दू यांच्या कंपनीत पैसे गुंतवले: मिळालेल्या माहितीनुसार ड्रग माफिया अली असगर शिराझीची कंपनी हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. या कंपनीने शिव ठाकरेला ‘ठाकरे चहा आणि नाश्ता’मध्येही गुंतवणूक केली आहे. याशिवाय अब्दू रोजिक यांच्या ‘बुर्गीर’मध्येही पैसे गुंतवले गेले आहेत. ड्रग माफिया कंपनीने नार्को फंडिंगच्या माध्यमातून पैसे कमवले आहेत. नार्को फंडिंगमध्ये डीलरच्या सहभागाची बातमी मिळताच या दोन्ही स्टार्सनी अली असगरच्या कंपनीसोबतचा बॉण्ड रद्द केला.
शिव ठाकरेचे वक्तव्य: शिव ठाकरेला ईडीसमोर आपले म्हणणे नोंदवले आहे. अभिनेत्याने ईडीला सांगितले की या कराराच्या वेळी तो शिराझीला भेटला नव्हता किंवा त्याला त्याच्याबद्दल माहिती नव्हती. कंपनीचे संचालक कृणाल ओझा यांच्या माध्यमातून त्यांचा सौदा झाल्याचे शिव ठाकरेने सांगितले.