Megha Dhade: बिग बॉस विजेती मेघा धाडेची भाजपाच्या ‘महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक’ पदी नियुक्ती; म्हणाली…

Megha Dhade Post: गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार मंडळी राजकारणामध्ये प्रवेश करत आहेत. नुकताच बिग बॉस फेम (Bigg Boss fame) अभिनेता अभिजीत केळकरनं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर आता भाजपाने एका महत्त्वाच्या पदी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती अभिनेत्री मेघा धाडेची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर (Social […]

Megha Dhade

Megha Dhade

Megha Dhade Post: गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार मंडळी राजकारणामध्ये प्रवेश करत आहेत. नुकताच बिग बॉस फेम (Bigg Boss fame) अभिनेता अभिजीत केळकरनं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर आता भाजपाने एका महत्त्वाच्या पदी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती अभिनेत्री मेघा धाडेची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर (Social media) पोस्ट करून याबाबद्दलची माहिती दिली आहे.


अभिनेत्री मेघा धाडेनं जून महिन्यामध्ये भाजपामध्ये प्रवेश करून आपल्याला राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती मेघाने भाजपात प्रवेश केला होता. यानंतर मेघाची चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यासंदर्भात मेघाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत सांगितले आहे की, “आज माझी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांच्या उपस्थितीमध्ये माझी महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच माझ्यासोबत अनेक कलाकारांचे पक्षप्रवेश करण्यात आले आहे. मला प्रिया ताईंनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी अगदी व्यवस्थित पार पाडणार आहे, अनेक कलाकारांना पक्षाशी जोडून जोमाने काम करण्याचा विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार….”, अशी पोस्ट यावेळी केली आहे.

Rajkummar Rao Birthday: एकेकाळी पार्ले-जी खाऊन उदरनिर्वाह करणारा हा अभिनेता आता बनलाय सुपरस्टार

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून अभिनेता सौरभ गोखलेनं भाजपामध्ये प्रवेश केला होता. तसेच जुलै महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अभिनेता हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, माधव देवचके या कलाकारांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता.

Exit mobile version