Rajkummar Rao Birthday: एकेकाळी पार्ले-जी खाऊन उदरनिर्वाह करणारा हा अभिनेता आता बनलाय सुपरस्टार

Rajkummar Rao Birthday: एकेकाळी पार्ले-जी खाऊन उदरनिर्वाह करणारा हा अभिनेता आता बनलाय सुपरस्टार

Happy Birthday Rajkummar Rao: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध आणि प्रतिभावान कलाकारांपैकी एक अभिनेता राजकुमार राव याचा आज (३१ ऑगस्ट) वाढदिवस आहे. (Rajkummar Rao ) अभिनेता राजकुमार राव यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९८४ दिवशी झाला. राजकुमार राव याने आपल्या हटक्या अभिनयाचा जलवा दाखवत ‘ट्रॅप्ड’, ‘शादी में जरूर आना’, ‘काई पो चे’, ‘न्यूटन’ असे अनेक हटके सिनेमा दिले आहेत.

परंतु या अभिनेत्याला खरी ओळख ‘बरेली की बर्फी’ या सिनेमातून मिळाली. त्याचा ‘बरेली की बर्फी’ हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि या सिनेमातील राजकुमारच्या हटक्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु मनोरंजन क्षेत्रात स्वत:चा एक अनोखा ठसा उमटवणाऱ्या राजकुमार रावसाठी इथपर्यंत पोहोचणं अशक्य होत. यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला होता. राजकुमार राव कामाच्या निमित्ताने मुंबईमध्ये स्थायिक झाला होता.

सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईमध्ये संघर्ष करत असताना त्याच्यावर एक वेळ अशी आली होती की, पार्ले जी बिस्किटं खाऊन तो स्वतःचं पोट भरत होता. हा असा काळ होता, जेव्हा त्याच्या बँक खात्यामध्ये साधे १८ रुपये देखील शिल्लक नसायचे. या संघर्षाच्या काळामध्ये काही मित्रांनी त्याला खूप मदत केली. राजकुमार रावला लहानपणापासून अभिनेता व्हायचे होते आणि यामुळेच त्याच्याकडे ‘प्लॅन बी’ असे काहीच नव्हते. राजकुमार रावला मनोरंजन क्षेत्रामध्ये मोठा ब्रेक २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रण’ सिनेमातून मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Travel + Leisure India (@travelandleisureindia)


या सिनेमात त्यांने न्यूज अँकरची भूमिका साकारली होती. परत २ महिन्यांनंतर, दिबाकर बॅनर्जीच्या ‘लव सेक्स और धोखा’मध्ये राजकुमार रावला मोठी भूमिका मिळाली. तो या सिनेमाच्या मुख्य स्टारकास्टचा एक भाग ठरला होता. राजकुमार रावला २०११मध्ये आलेल्या हॉरर फिल्म ‘रागिनी एमएमएस’मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. २०१३मध्ये राजकुमार राव, सुशांत सिंह राजपूतबरोबर ‘काई पो चे’ या सिनेमात दिसला होता. हा सिनेमा देखील हिट झाला आणि राजकुमार रावला या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला होता.

Gadar 2 च्या निर्मात्यांनी दिलं चाहत्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट!

राजकुमार रावने स्वतःच्या बळावर आज हे यश मिळवले आहे. त्याची कोणतीही फिल्मी बॅग्राऊंड नाही. तसेच बाहेरून आलेल्या लोकांना मनोरंजन क्षेत्रात आपले अनोखे स्थान निर्माण करणे खूप अवघड असते, असे तो नेहमी सांगत असतो. राजकुमार राव लवकरच ‘स्त्री २’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ यासारख्या सिनेमामध्ये झळकणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube