Bobby Deol’s comfort zone is gone : दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला ‘बंदर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. निर्माता निखिल द्विवेदी यांच्या निर्मितीत तयार होणाऱ्या या चित्रपटात बॉबी देओल एका पूर्णपणे वेगळ्या आणि तीव्र भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना बॉबी देओल म्हणाले, “प्रत्येक कलाकाराला काहीतरी नवीन करायचे असते, कारण एक प्रतिमा तयार होते आणि त्यातून बाहेर पडणे खूप कठीण जाते. मला देखील त्याचा अनुभव आला आहे.
पण आता मला असे वाटते की हा चित्रपट माझ्यासाठी पूर्णपणे वेगळा अनुभव होता. मी माझी लाज बाजूला ठेवली आणि कोणतीही भीड न बाळगता ही भूमिका साकारली.” अलीकडील प्रभावी कामगिरीनंतर बॉबी देओल या तीव्र कथानकाच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाला झी स्टुडिओज यांचेही पाठबळ आहे. कथा लेखन सुदीप शर्मा आणि अभिषेक बॅनर्जी यांनी केले आहे. सुदीप शर्मा यांनी अलीकडेच ‘कोहर्रा 2’चे दिग्दर्शन केले असून त्याला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे.
या चित्रपटात सान्या मल्होत्रा, राज बी शेट्टी, जितेंद्र जोशी, सपना पब्बी, इंद्रजीत सुकुमारन, रिद्धी सेन, सबा आझाद आणि नागेश भोसले हे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तगडी टीम आणि दमदार कलाकारांच्या जोरावर ‘बंदर’ हा 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरणार आहे.
