Govinda Update : बॉलिवूड अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा राहत्या घरी आचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती गोविंदा यांचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी खासदार आणि बॉलिवूड अभिनेते गोविंदाला मंगळवारी जुहूतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गोविंदा अचानक त्यांच्या घरी बेशुद्ध पडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जुहूतील क्रिटिकेअर रुग्णालयात (Critical Care Hospital) दाखल करण्यात आले असल्याची माहिती गोविंदा यांचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी दिली.
गोविंदा (Govinda) यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना ललित बिंदल (Lalit Bindal) म्हणाले की, राहत्या घरी गोविंदाजी अचानक बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी जुहूतील क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. गोविंदा यांच्या सर्व महत्वाच्या पॅरामीटर्सवर तपासण्या केल्या जात आहे आणि त्यांना त्रास कशामुळे झाला याबाबत माहिती डॉक्टर देणार आहे असं ललित बिंदल म्हणाले.
दिवंगत अभिनेते विनय आपटेंच्या स्मृतिदिनानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धा; वाचा, पूर्ण माहिती
तर दुसरीकडे बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची देखील प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीसमोर आली आहे. माहितीनुसार जेष्ठ अभिनेता धर्मेंद्र सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
