दिवंगत अभिनेते विनय आपटेंच्या स्मृतिदिनानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धा; वाचा, पूर्ण माहिती

शॉर्ट फिल्म पाठवण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबरपर्यन्त आहे. यावर्षी ह्या शॉर्ट फिल्म्सना विषयाचे बंधन नाही.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 11T230650.704

सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे (Film) ह्यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठान आणि मुंबईतल्या विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालय ह्यांच्या संयुक्त विद्यमाने लघु चित्र (शॉर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शॉर्ट फिल्म पाठवण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबरपर्यन्त आहे. यावर्षी ह्या शॉर्ट फिल्म्सना विषयाचे बंधन नाही. कुठल्याही विषयावर शॉर्ट फिल्म्स पाठवता येतील. मात्र ती जास्तीतजास्त 20 मिनिटांची असावी. त्यासाठी 25 वर्षांखालील आणि 25 वर्षांवरील असे दोन वयोगट ठेवण्यात आले आहेत. तसेच ह्या शॉर्ट फिल्म्स मराठी, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत पाठवता येतील.

मोठी बातमी! कोथरूड मधील दलित मुलींवर हिंसाचार प्रकरण, कोर्टाने दिला मोठा आदेश

प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येईल. दोन्ही गटातील सर्वोत्कृष्ट विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका vinayaptepratishthan@gmail.com या संकेतस्थळावर दि. २५ नोव्हेंबर २०२५पर्यन्त पाठवायच्या आहेत. प्रवेशमूल्य रु. 500 आहे.

स्पर्धेतील दोन्ही गटात प्रत्येकी प्रथम क्रमांकाच्या शॉर्ट फिल्मला रु. 15,000/- द्वितीय क्रमांकाला 10,000/- आणि तृतीय क्रमांकाला रु. 7,500/- अशी रोख पारितोषिके देण्यात येतील. ह्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरुसोत्तम बेर्डे, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ संकलक राजन वाघधरे, जाहिराततज्ज्ञ भरत दाभोळकर, ज्येष्ठ चित्रपट संकलक भक्ती मायाळू आणि सुप्रसिद्ध लेखिका आणि गीतकार रोहिणी निनावे हे आहेत.

follow us