Zareen Khan : बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानच्या अडचणीत वाढ, अटक वॉरंट जारी, नेमकं प्रकरण तरी काय?

Zareen Khan arrest warrant : सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) आतापर्यंत अनेक चित्रपटामध्ये काम करून चाहत्यांचं मनोरंजन केलं. इतकंच नाही तर सलमानने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये संधी दिली. दरम्यान, आता सलमान सोबत ‘वीर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री जरीन खानच्या (Zareen Khan) अडचणीत वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या सियालदह कोर्टाने […]

Untitled Design (1)

Zareen Khan arrest warrant

Zareen Khan arrest warrant : सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) आतापर्यंत अनेक चित्रपटामध्ये काम करून चाहत्यांचं मनोरंजन केलं. इतकंच नाही तर सलमानने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये संधी दिली. दरम्यान, आता सलमान सोबत ‘वीर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री जरीन खानच्या (Zareen Khan) अडचणीत वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या सियालदह कोर्टाने जरीन खानच्या नावे अटक वॉरंट जारी केला आहे. एका कंपनीने जरीन विरोधात तक्रार दाखल केली होती.

नेमकं प्रकरण काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2018 मध्ये सहा कार्यक्रमांना हजर न राहिल्याबद्दल जरीन विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. कोलकाता आणि उत्तर 24 परगणा येथील 6 काली पूजेच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल जरीन खानच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने जरीन विरोधात नरकेलडांगा पोलिस ठाण्यात या तक्रार दाखल केली होती. जरीन विरोधात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नरकेलडांगा पोलीसांनी सदर प्रकरणाबाबत जरीनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र जरीन खानकडून पोलिसांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर न्यायालयाने तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

महिला उद्योजकांसाठी केंद्र सरकारच्या ‘या’ खास कर्ज योजनांबद्दल तुम्हाला माहित आहे का? 

जरीन खानने 2010 मध्ये बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातून अभिनेत्रीला खूप प्रसिद्धीही मिळाली. त्याच वेळी, अभिनेत्री सलमान स्टारर ‘रेड्डी’ चित्रपटातील आयटम सॉंग ढीला है यातही दिसली होती. यानंतर ती हाऊसफुल २ हेट स्टोरी 3 या चित्रपटात दिसली. जरीन खानने बॉलिवूडशिवाय तमिळ आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.जरीन खानने ‘चाणक्य’ या अॅक्शन थ्रिलरमधून तेलुगू सिनेमात पदार्पण केले.

जरीन खानने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कतरिनाशी तुलना केल्याबद्दल बोलली होती. ती म्हणाली होती की, जेव्हा माझी कतरिनासोबत तुलना केली जाते तेव्हा मला खूप आनंद होतो. कारण मी स्वतः तिची खूप मोठी चाहती आहे आणि मला ती खूप सुंदर वाटते. पण या तुलनेचा माझ्या करिअरवर विपरीत परिणाम झाला… तुलनेमुळे इंडस्ट्रीतील लोकांनी मला माझे कौशल्य सिद्ध करण्याची संधी दिली नाही.

 

Exit mobile version