Maidan Box Office: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा अशा स्टार्सपैकी एक आहे, जो कमी बजेटच्या चित्रपटांमध्येही धमाका निर्माण करतो. (Maidan Movie) गेल्या अनेक वर्षांपासून अजय देवगण त्याच्या कमी बजेटच्या चित्रपटांनी थिएटर्समध्ये धुमाकूळ घालत असल्याचे दिसून आले आणि त्याच्या चित्रपटांनी त्याला अजिबात निराश केले नाही. मात्र यावेळी तसे होताना दिसत नाही. यावेळी ईदच्या मुहूर्तावर अजय देवगणने त्याच्या ‘मैदान’ हा चित्रपटही थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. पण या चित्रपटाची परिस्थिती फारशी चांगली दिसत नाही.
पुन्हा एकदा अजय आणि अक्षयचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमने- सामने आले होते. पण अजय देवगणच्या ‘मैदान’विषयी बोलायचे झाले तर, निर्मात्यांनी 100 कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट तयार केला होता. मात्र रिलीज होऊन 8 दिवस उलटूनही हा चित्रपट आपल्या बजेटच्या निम्मीही कमाई करू शकलेला नाही. मैदानाच्या कमाईचे आकडे पाहून निर्माते खूपच निराश झाले आहेत.
‘मैदान’चा आठव्या दिवसाची कमाई किती
SACNL च्या नवीन अहवालानुसार, अजय देगवानच्या मैदानाने गुरुवारी केवळ 1.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर मैदानाचे एकूण कलेक्शन आतापर्यंत केवळ 28.25 कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच हे चित्र 8 दिवसांत 30 कोटी रुपयेही कमवू शकलेले नाही. चित्रपटाची अवस्था पाहता हे चित्र 100 कोटींचे बजेट कसे वसूल करणार याची चिंता निर्मात्यांना वाटू लागली आहे.
TMKOC: ‘तारक मेहता…’मधल्या टप्पूने चाहत्यांना दिली खुशखबर; फोटो शेअर करत लिहिले…
तसं पाहिलं तर निर्मात्यांना काळजी वाटणं योग्यच आहे. कारण 8 दिवसात मैदानाने एक दिवसाचीही चांगली कमाई केलेली नाही. दुसरा वीकेंड सुरू होणार असला तरी चित्रपटाच्या कमाईत मोठी झेप पडण्याची शक्यता आहे. अजय देवगणची मैदानाची कथा लोकांना खूप आवडली आहे. समीक्षकांनीही या सिनेमाचे भरपूर कौतुक केले आहे. पण तरीही हा चित्रपट कमाईच्या बाबतीत कमी पडत असल्याचे दिसत आहे.