Bollywood captivated by Tarade Pattern Marathi film’s ‘theater visits’ creating buzz in Hindi cinema circles : मराठी सिनेसृष्टीत आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या एका खास पॅटर्नची चर्चा आता थेट बॉलिवूडमध्ये सुरू झाली आहे. मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी प्रवीण तरडे यांनी सुरू केलेल्या ‘थिएटर व्हिजिट’ (चित्रपटगृहांना प्रत्यक्ष भेटी देणे) या पॅटर्नला आता बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकारही फॉलो करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटाची ही प्रसिद्धी शैली हिंदी सिनेसृष्टीने स्वीकारण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.
झी मराठीवर ‘या’ दोन ब्लॉकबस्टर शो आणि दोन लोकप्रिय स्टार्सचं भव्य पुनरागमन!
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा कौल जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी चित्रपटगृहांना भेटी देण्याचा ‘तरडे पॅटर्न’ प्रचंड यशस्वी ठरला आहे. याच पॅटर्नच्या प्रेमात आता बॉलिवूडही पडले आहे.सध्या हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रिती सेनन, सारा अली खान यांच्यासह अनेक बडे बॉलिवूड कलाकार आपल्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी थेट थिएटर व्हिजिट करताना दिसत आहेत.
लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवालचा मृत्यू नाही तर हत्या; धक्कादायक कटा’चा झाला उलगडा
बॉलिवूडमधील सर्वच नट-नट्यांसाठी आता ‘थिएटर व्हिजिट’ करणे जणू सक्तीचे (कंपलसरी) झाले आहे.मराठी सिनेसृष्टीतील एका दिग्दर्शकाने सुरू केलेली ही परंपरा आज हिंदी सिनेमाच्या प्रसिद्धीचे मुख्य माध्यम बनत आहे, हे प्रवीण तरडे आणि संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचे मोठे यश मानले जात आहे.
