Download App

Chiranjeeviने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट; आगामी सिनेमाचं पोस्टर शेअर करत म्हणाला…

Chiranjeevi Mega 157 Poster Out : साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आज आपला ६८ वा वाढदिवस साजरा करत आहे. आजवर अभिनेत्याने एका पेक्षा एक हटके सिनेमी दिले आहेत. तो कायम चाहत्यांचे मनोरंजन करत असल्याचे बघायला मिळत असतो. त्यांचे अनेक सिनेमे चांगलेच सुपरहिट ठरले आहेत.

आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘मेगा 157’ (Mega 157) या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. सध्या पोस्टर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टरवरून चाहत्यांना आता या सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीच वाढत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘मेगा 157’ या सिनेमाचे निर्मिती यूवी क्रिएशन्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात येणार आहे. त्यांनी या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करत अभिनेत्याला वाढदिवसाची भेट देण्यात आली आहे.


या पोस्टरने चाहत्यांचा लक्ष वेधून घेतल्याचे बघायला मिळत आहे. ‘मेगा 157’ हा चिरंजीवी यांच्या करिअरमधला सर्वात मोठा बजेट सिनेमा रुजणार आहे. वशिष्ठ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सोपविण्यात आली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मेगास्टार चिरंजीवीचा एक अनोखा अंदाज चाहत्यांना बघायला मिळणार आहे. वामसी, विक्रम आणि प्रमोद या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. अद्याप या सिनेमाची स्टारकास्टबद्दल माहिती देण्यात आली नाही. चिरंजीवी यंदाचा वाढदिवस नातीसोबत साजरा करणार आहे.

Chandrayaan 3 ची’खिल्ली उडवणं पडलं महागात! प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल

चिरंजीवीचा ‘मेगा 157’ हा सिनेमा फँटसी वर्ल्डवर यावर आधारित राहणार आहे. ‘मेगा 157’ हा सिनेमा देशभर  प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसामध्ये अनेक दाक्षिणात्य सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला बघायला मिळत आहे. यामध्ये जेलर, केजीएफ 2, पीएस 2 आणि कांतारा या सिनेमांचा समावेश आहे. आता चिरंजीवीच्या आगामी ‘मेगा 157’ सिनेमाची चाहत्यांना चांगलीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. या सिनेमात ते नेमके कोणाबरोबर स्क्रीन शेअर करणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक वाट पाहत आहेत.

Tags

follow us