Chandrayaan 3ची खिल्ली उडवणं पडलं महागात! प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल
Prakash Raj Tweet: अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांना चांद्रयानाबद्दल (Chandrayaan 3) ट्वीट करणं चांगलच महागात पडला आहे. चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवल्या प्रकरणी प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे. हिंदू संघटनांच्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध कर्नाटकमधील (Karnataka) बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी पोलीस ठाण्यामध्ये (Banhatti Police Station) तक्रार दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.
BREAKING NEWS:-
First picture coming from the Moon by #VikramLander Wowww #justasking pic.twitter.com/RNy7zmSp3G— Prakash Raj (@prakashraaj) August 20, 2023
प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचं व्यंगचित्र शेअर करण्यात आले होते. यामध्ये के सिवन हे चहा ओतत असताना दिसून आले आहेत. ‘चंद्रावरून विक्रम लँडरने पाठवलेला पहिला फोटो, वॉव’ असं म्हणत त्यांनी हे व्यंगचित्र शेअर करण्यात आले आणि चांद्रयान-३ ची चांगलीच खिल्ली उडवली. त्यानंतर नेटकरी संताप व्यक्त केला आणि त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केले.
Hate sees only Hate.. i was referring to a joke of #Armstrong times .. celebrating our kerala Chaiwala .. which Chaiwala did the TROLLS see ?? .. if you dont get a joke then the joke is on you .. GROW UP #justasking https://t.co/NFHkqJy532
— Prakash Raj (@prakashraaj) August 21, 2023
एवढा द्वेष करणाऱ्यांना फक्त द्वेष दिसत असतो. मी आर्मस्ट्राँग टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या विनोदाचा संदर्भ देत असल्याचे त्यांनी यवसली सांगितले आहे. जे आमच्या केरळच्या चहा विक्रेत्याचा आनंद साजरा करण्यात आले होते. ट्रोल्सनी कोणत्या चहा विक्रेत्याला बघितलं? जर तुम्हाला विनोद समजला नसेल तर हा विनोद तुमच्यावर आहे, मोठे व्हा असं प्रकाश राज यांनी ट्विट करत जोरदार खिल्ली उडवली आहे.
Pulkit Samrat: ‘फुकरे’ फेम पुलकित सम्राटचा हटके आऊटफिट पाहिलात का?
दरम्यान प्रकाश राज हे अनेक सामाजिक आणि राजकीय घटनांवर ट्विटर आपली सडेतोड मत मांडत असताना दिसून येत असतात. अनेकवेळा ते त्यांच्या कृतीमुळे ट्रोल देखील होत असताना बघायला मिळत असतात. त्यांच्या या ट्वीटनंतर ‘प्रकाश राज कधीही द्वेषाचा तुमच्यावर एवढा प्रभाव पडू देऊ नका की तुम्हाला तुमच्या देशाची आणि तुमच्या लोकांची प्रगती आणि प्रयत्नांचा तिरस्कार वाटेल’, अशा खोचक प्रतिक्रिया सध्या नेटकरी करत असल्याचे दिसत आहे.