Fukrey 3 Song Out: कॉमेडी, ड्रामा ‘फुकरे 3’चं पहिलं गाणं प्रदर्शित

Fukrey 3 Song: बॉलिवूडमध्ये सध्या जबरदस्त सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. (Bollywood) अशामध्ये सर्वजण ‘फुकरे ३’ सिनेमाची (fukrey 3 Movie) मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत आहे. फुकरे फ्रँचायझी हा कॉमेडी ड्रामा सिनेमा आतापर्यंत चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करत आला आहे. या सिनेमाचा तिसरा भाग म्हणजेच ‘फुकरे ३’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच ‘फुकरे ३’ सिनेमाचे […]

Fukrey 3 Song Out

Fukrey 3 Song Out

Fukrey 3 Song: बॉलिवूडमध्ये सध्या जबरदस्त सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. (Bollywood) अशामध्ये सर्वजण ‘फुकरे ३’ सिनेमाची (fukrey 3 Movie) मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत आहे. फुकरे फ्रँचायझी हा कॉमेडी ड्रामा सिनेमा आतापर्यंत चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करत आला आहे. या सिनेमाचा तिसरा भाग म्हणजेच ‘फुकरे ३’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच ‘फुकरे ३’ सिनेमाचे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच आता या सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आला.

फुकरे सिनेमा त्याच्या जबरदस्त पात्रांसाठी तसेच प्रभावी गाण्यांसाठी चांगलाच ओळखला जातो. या सिनेमाने ‘अंबर सरिया’, ‘बेडा पार’ आणि ‘करले जुगाड करले’सह अनेक सुपरहिट गाणी दिल्याचे आपण पाहिलं आहे. आता ‘फुकरे ३’ सिनेमाबद्दल चाहते अशीच अपेक्षा करत आहे. या सिनेमातील गाणी देखील हटके असतील अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहे. तसेच ११ सप्टेंबर म्हणजे आज ‘फुकरे ३’ सिनेमाचे पहिले गाणं ‘फुकरे वे’ प्रदर्शित  करण्यात आला आहे.

या गाण्यामध्ये हनी आणि चुचाबरोबर पंडितजी देखील नाचत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘वे फुकरे’ हे फुट-टॅपिंग गाणं आहे. फुकरे ३ चं हे नवीन गाणं तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केल्याचे सांगितले जात आहे. तर, देव नेगी आणि असीस कौर यांनी ‘वे फुकरे’ या गाण्याला आवाज दिल्याचे ऐकायला मिळत आहे. गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी संगीतबद्ध केले आहे. तर कोरिओग्राफी बॉस्को मार्टिस यांनी केले आहे. ‘फुकरे ३’ चे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा यांनी केले आहे. २८ सप्टेंबर दिवशी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Kiran Mane: किंग खानमुळे किरण माने चर्चेत! काय आहे नेमकं प्रकरण?

‘फुकरे ३’ मध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी हे मुख्य भूमिकेमध्ये आहे. तसेच भोली पंजाबनच्या भूमिकेत रिचा चढ्ढा पुन्हा एकदा फुकर्सना क्लासेस देत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘फुकरे ३’ च्या ट्रेलरमध्ये अली फजल दिसला नाही. या सिनेमाच्या मागच्या दोन भागामध्ये या अभिनेत्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘फुकरे ३’ मध्ये अली फजल असणार की नाही हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच समजणार आहे.

Exit mobile version