Download App

राजपाल यादवचे ग्रह फिरले! बँकेने कोट्यवधींची प्रॉपर्टीच केली सील; कारण ऐकून बसेल धक्का

हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता राजपाल यादव आर्थिक संकटात सापडला आहे. कोट्यवधींची संपत्ती बँकेने जप्त केली आहे.

Rajpal Yadav News : हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता राजपाल यादव आर्थिक (Rajpal Yadav) संकटात सापडला आहे. राजपालची कोट्यवधींची संपत्ती बँकेने जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. बँकेने संपत्ती कशासाठी जप्त केली असा प्रश्न पडला असेल. तर हे प्रकरण जुनच आहे. राजपाल यादवच्या ‘अता पता लापता’ या चित्रपटाशी (Bollywood) संबंधित हे प्रकरण आहे. हा चित्रपट स्वतः राजपालनेच दिग्दर्शित (Hindi Cinema0) केला होता. त्याची पत्नी राधा यादव चित्रपटाची प्रोड्यूसर होती.

पिक्चर तयार करण्यासाठी आपल्याकडे जे काही होतं ते सगळं राजपालने गहाण ठेवलं होतं. त्याने या पिक्चरसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वांद्रे (Central Bank of India) शाखेतून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी राजपालने त्याच्या वडिलांच्या नावावर असलेली जमीन आणि घर तारण ठेवले होते. आता कर्ज काही राजपालला फेडता आलं नाही. तेव्हा बँकेने पुढील कार्यवाही करत शाहजहांपूर येथील संपत्ती बँकेने जप्त केली आहे. राजपालने तीन कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं जे नंतर 11 कोटींपर्यंत पोहोचलं होतं.

PHOTO : 26 हजारात केस कापून राजपाल यादव सेटवर पोहोचला, हे पाहून दिग्दर्शकाचा राग अनावर

काही मिडिया रिपोर्टसमध्ये असा दावा करण्यात आला आहे की सेंट्रल बँकेचे अधिकारी दोन दिवसांपूर्वी शहाजहांपूरमध्ये आले होते. टीमने अत्यंत गोपनीय पद्धतीने राजपालच्या प्रॉपर्टीवर बँकेचा बॅनर लावला. ही संपत्ती सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबईची आहे. या संपत्तीवर आता कोणत्याही प्रकारचा खरेदी विक्रीचा व्यवहार करू नये असे या बॅनरमध्ये म्हटले आहे.

कुलरही सुरुच ठेवला

राजपाल यादवची प्रॉपर्टी एका मार्बल विक्रेत्याला भाडोत्री देण्यात आलेली आहे. आता बँकेच्या अधिकाऱ्यांनी गेटवर लावलेल्या कुलूपाला सील ठोकले आहे. हे काम इतक्या वेगाने करण्यात आले की आत चालू असलेला कुलरही बंद केला नाही. ही कारवाई इतक्या झटपट का केली असा प्रश्न आता गावातील लोक विचारू लागले आहेत. तसेच या बातमीची चर्चा सर्वदूर पोहोचली आहे.

Box Office: कार्तिकच्या चंदू चॅम्पियनची दमदार सुरूवात, पण थिएटरमध्ये कोकणी मुंज्याचाच बोलबाला

राजपालला तुरुंगवास

याआधी 2018 मध्ये राजपाल यादवला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. दिल्लीतील कंपनी मुरली प्रोजेक्ट्ने राजपाल यादवची कंपनी श्री नौरंग गोदावरी एंटरटेनमेंट विरुद्ध खटला दाखल केला होता. राजपाल यादवने हे कर्ज 2010 मध्ये घेतलं होतं. आता पुन्हा कर्जामुळेच राजपालच्या अडचणी वाढल्या आहेत. कर्ज फेडले नाही म्हणून कंपनीने थेट संपत्तीच जप्त केली आहे. आता राजपाल यादव पुढे काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार  आहे.

follow us