Satyaprem ki katha : कार्तिक-कियाराच्या रोमॅन्टिक चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Satyaprem ki katha : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aryan)आणि अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या त्यांच्या आगामी सत्यप्रेम की कथा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर (Teaser)आणि नसीब से हे गाणं रिलीज झालं आहे. याशिवाय अनेक पोस्टर्स रिलीज (Posters released)करण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी एक नवीन पोस्टर समोर आले आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज […]

Kartik Aryan

Kartik Aryan

Satyaprem ki katha : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aryan)आणि अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या त्यांच्या आगामी सत्यप्रेम की कथा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर (Teaser)आणि नसीब से हे गाणं रिलीज झालं आहे. याशिवाय अनेक पोस्टर्स रिलीज (Posters released)करण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी एक नवीन पोस्टर समोर आले आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर केली आहे.

उर्फी जावेदने टी बॅगचा बनवला ड्रेस, सोशल मीडियावर झाली ट्रोल, युजर म्हणाले ‘डायपर ड्रेस बाकी आहे, करून पहा’

एका मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार कियाराच्या आगामी सत्यप्रेम की कथा चा ट्रेलर उद्या (दि.5) रिलीज होणार आहे. याचा निर्णय आज म्हणजेच 4 जूनपर्यंत घेणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.

सत्यप्रेम की कथा या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज तारीख समोर येताच चाहते उत्साहित झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले, शेवटी ट्रेलर उद्या रिलीज होत आहे. दुसर्‍याने लिहिले, सत्तू आणि कथा यांना भेटण्याची वाट पाहत आहे. तर तिसर्‍या चाहत्याने लिहिले, आता भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.


समीर विद्वांस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे नाव आधी सत्यनारायण की कथा असं होतं, मात्र त्याच्या नावावरुन झालेल्या वादामुळं त्याचं नाव ‘सत्यप्रेम की कथा’ असं ठेवण्यात आलं आहे. हा चित्रपट 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सत्यप्रेम की कथा या चित्रपटाव्यतिरिक्त कार्तिक आर्यन आशिकी 3, कॅप्टन इंडिया या चित्रपटात दिसणार आहे. तर, कियारा अडवाणी सत्यप्रेम की कथा या चित्रपटाबरोबरच गेम चेंजर चित्रपटात दिसणार आहे.

Exit mobile version