सोनम कपूरने न्यूयॉर्कमध्ये फॅशन लिजेंड टॉमी हिलफिगरची भेट घेतली…

भारतात बॉलिवूड विश्वातली फॅशन आयकॉन सोनम कपूरने जागतिक कार्यक्रमात सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. सोनम आज न्यूयॉर्कमध्ये दिसली असून न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये प्रसिद्ध डिझायनर टॉमी हिलफिगरच्या शोमध्ये पोहचली होती. या कार्यक्रमात तिने फॅशन लिजेंड टॉमी हिलफिगरची भेट घेतली आहे. या कार्यक्रमात तिच्या निळ्या पॅंट सूटमध्ये हॉटलूक दिसत होता. तिने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचं पट्टेदार शर्टाचा […]

Sonam Kapoor

Sonam Kapoor

भारतात बॉलिवूड विश्वातली फॅशन आयकॉन सोनम कपूरने जागतिक कार्यक्रमात सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. सोनम आज न्यूयॉर्कमध्ये दिसली असून न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये प्रसिद्ध डिझायनर टॉमी हिलफिगरच्या शोमध्ये पोहचली होती. या कार्यक्रमात तिने फॅशन लिजेंड टॉमी हिलफिगरची भेट घेतली आहे. या कार्यक्रमात तिच्या निळ्या पॅंट सूटमध्ये हॉटलूक दिसत होता. तिने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचं पट्टेदार शर्टाचा पेहराव केला होता.

सोनमच्या या ग्लॅमर लुकमध्ये तिने मोकळे केस सोडले तर लाल रंगाची लिपस्टीक लावणं तिने पसंत केलं होतं. सोनमच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंटसचा वर्षावर केला आहे. तिने आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरुन या कार्यक्रमाचे फोटो शेअर करीत एक कॅप्शनही दिले आहे.

हमीभावापेक्षा कमी दर, शेतकऱ्याने कापूस पेटवला; वडेट्टीवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल, ‘हमीभाव मिळेल…’

सोनम पोस्टमध्ये म्हणाली, टॉमीहिलफिगर @tommyhilfiger 36 तास माझ्या आवडत्या NY मध्ये एका प्रतिष्ठित ठिकाणी आणि एक उत्तम शो.. तो असताना मला मिळालेला सर्वात मजेदार अनुभव आहे. ‘मला असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद… मी परत येण्याची वाट पाहू शकत नाही.’ असं कॅप्शन तिने दिलं आहे.

Exit mobile version