Download App

‘कांतारा’च्या प्रिक्वेलमध्ये गुलशन देवैया कुलशेखरच्या भूमिकेत; पॅन-इंडिया चित्रपटातील दमदार पदार्पण!

बॉलिवूड अभिनेता गुलशन देवय्या यांचा (Gulshan Devaiah) कुलशेखर या भूमिकेतील पहिला लूक अखेर उघड केला आहे

Kantara A Legend Chapter 1 Movie : या वर्षातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया चित्रपटाच्या निर्मात्यांनी, ‘कांतारा: अध्याय 1’ या (Kantara : A Legend Chapter) बहुप्रतिक्षित सिनेमासाठी बॉलिवूड अभिनेता गुलशन देवय्या यांचा (Gulshan Devaiah) कुलशेखर या भूमिकेतील पहिला लूक अखेर उघड केला आहे. 2022 मधील ब्लॉकबस्टर कांताराच्या या प्रिक्वेलमध्ये गुलशन यांचा प्रवेश झाला असून, या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

लेखन आणि दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांचे असून तेच पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ‘कांतारा: अध्याय 1’ हे पूर्वीच्या कथानकाचा विस्तार करत एक नवे अध्याय उघडणार आहे. पहिल्या भागाने जसा लोककथा, अध्यात्म आणि मानवी भावना यांचा सुंदर संगम घडवून मांडणीला नवे मापदंड दिले तसा हा प्रिक्वेल त्या कथानकाच्या मुळाशी जाऊन आणखी गहिरे आणि प्रभावी स्तर उलगडणार आहे.

‘WAR 2’चा जलवा! फक्त 5 दिवसांत 300 कोटींचा टप्पा गाठला

या चित्रपटाचे छायाचित्रण अरविंद एस. कश्यप यांचे असून संगीत बी. अजनिश लोकनाथ यांचे आहे. ज्यांच्या संगिताने पहिल्या भागात प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. विजय किराबंदूर यांची निर्मिती असलेल्या होम्बळे फिल्म्सच्या बॅनरखाली बनणारा हा चित्रपट दर्जेदार निर्मितीमूल्यांसाठी ओळखला जातो. गुलशन देवय्या यांचा कुलशेखर या भूमिकेतील पहिला लुक प्रेक्षकांसमोर येताच, त्यांचा पात्र कथानकात कशा प्रकारे गुंफला जाईल याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हा भव्य चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार असून,कन्नड, तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी या सात भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल.

follow us