Download App

Manushi Chhillar : आजच्याच दिवशी मिळाला ‘मिस वर्ल्ड’ सन्मान; मानुषी छिल्लरचा प्रेरणादायक प्रवास

Manushi Chhillar : 18 नोव्हेंबर आजचा दिवस. याच दिवशी बरोबर सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 18 नोव्हेंबर 2017 रोजी मानुषी छिल्लरने (Manushi Chhillar) 17 वर्षांनंतर भारतात पुनरागमन करत मिस वर्ल्डचा किताब जिंकून इतिहास घडवला होता. हरियाणा राज्याचे प्रतिनिधित्व करत तिच्या विजयाने केवळ तिचे सौंदर्यच नव्हे तर तिची बुद्धिमत्ता आणि करिष्मा देखील साजरा केला होता. मिस वर्ल्डचा किताब पटकावण्यापासून ते मानुषीने फॅशन, सोशल वर्क आणि बॉलीवूडच्या जगात सहजतेने आपली छाप पाडली. एक फॅशन आयकॉन म्हणून तिने आपली ओळख संपादन केली. एका छोट्या शहरातून जागतिक फॅशन स्टेजपर्यंतचा तिचा हा प्रवास कायम प्रेरणादायक असाच आहे.

फिल्ममेकर शेखर कपूर यांची सिंगापूरमधील कार्यक्रमाला हजेरी, क्रिएटिव्हिटी इन मिथ मेकिंगवर केलं मार्गदर्शन

फॅशन, अभिनय यांच्या पलीकडे जाऊन मानुषीची सामाजिक बांधिलकी देखील तिच्या प्रयत्नांतून दिसून येते. पर्यावरणीय कारणांमध्ये गुंतून जाऊन जसे की गणपती उत्सवानंतर समुद्रकिनारा साफ करणं यातून तिने अनोखी सामाजिक बंधालकी देखील जपली. व्यावसायिक आघाडीवर मानुषी यशस्वी वाटचाल करत आहे. “द ग्रेट इंडियन फॅमिली” आणि “ऑपरेशन व्हॅलेंटाईन” सारख्या प्रकल्पांसह तिने मनोरंजन उद्योगात एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून आपली क्षमता सिद्ध केली आहे.

एका छोट्या शहरापासून जागतिक फॅशन स्टेजपर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. चकचकीतपणा आणि ग्लॅमरच्या पलीकड मानुषीने सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यही केले. पर्यावरणविषयक समस्यांबद्दलची तिची बांधिलकी गणेशोत्सवानंतर समुद्रकिनारी साफसफाई, सकारात्मक बदलांचा पुरस्कार यांसारख्या उपक्रमांतून दिसून येते.

Tags

follow us