फिल्ममेकर शेखर कपूर यांची सिंगापूरमधील कार्यक्रमाला हजेरी, क्रिएटिव्हिटी इन मिथ मेकिंगवर केलं मार्गदर्शन

  • Written By: Published:
फिल्ममेकर शेखर कपूर यांची सिंगापूरमधील कार्यक्रमाला हजेरी, क्रिएटिव्हिटी इन मिथ मेकिंगवर केलं मार्गदर्शन

Shekhar Kapur : प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते शेखर कपूर (Shekhar Kapur) यांनी सिंगापूर फिनटेक फेस्टिव्हलमध्ये (Singapore FinTech Festival) 10 नोव्हेंबर रोजी 1880 ड्रीम कॅचर्स इव्हेंटमला खास हजेरी लावली. प्रसिद्ध बँकर पियुष गुप्ता यांच्या सोबत त्यांचे रिबेलियन अँड क्रिएटिव्हिटी इन मिथ मेकिंग हे खास सत्र इकडे पार पडलं.

फायनलसाठी रोहित शर्माचा गेम प्लान तयार, प्लेईंग-11 कशी असेल? 

नाविन्यपूर्ण आर्थिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एकत्र आणणाऱ्या या कार्यक्रमात AI ची वित्त क्षेत्रातील नवीन कामगिरी, AI मुळं चित्रपट क्षेत्रात होणारे बदल अश्या विविधांगी विषयावर चर्चा झाली. या महोत्सवात उद्योजक आणि AI क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांच्या गाठीभेठी भेटी झाल्या. २१ व्या शतकात AI ची भूमिका आणि आणि नावीन्यपूर्ण विचारांसाची सांगड या विषयावर शेखर कपूर यांनी या सत्रात मार्गदर्शन दिलं.

शेखर कपूर हे बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये आपल्या नाविन्यपूर्ण कामासाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळंच शेखर कपूर यांना या सिंगापूर फिनटेक फेस्टिव्हलमध्ये आमंत्रित केलं होतं. यावेळी त्यांनी AI च्या भूमिकेबद्दल आणि एआयमुळं होणाऱ्या बदलांबाबत भाष्य केलं. त्यांनी एआयचं महत्वंही अधोरेखीत केलं. याशिवाय, त्यांनी चित्रपटांविषयक अनेक गोष्टीवर आपलं मत मांडले. सिनेमा कसा घडतो, दिग्दर्शक आपल्या विचारांना, कल्पनांना कसं फुलवत लोकांसमोर आणतो, याविषयी त्यांनी प्रभावी भाष्य केलं.

IND vs AUS Final : फायनल सामना बरोबरीत राहिला तर विनर कोण? ICC ने आणला नवा नियम 

ते म्हणाले, कलावंताने कायम शोध घेतला पाहिजे. मी आता माझ्या लेखन कारकिर्दीपासून दूर गेलो. पण, माझा आत्म-शोधाचा प्रवास सुरू केला. माझा विश्वास आहे की जोपर्यंत आपण शोधत राहू तोपर्यंत आपण खरोखर जिवंत आहोत. ज्याचा शोध संपला तो कलावंत म्हणून संपला. कपूर यांची सिनेमॅटिक मिथक मेकिंगची प्रगल्भ पकड प्रेक्षकांना केवळ प्रेरितच नाही तर त्यांना प्रोत्साहन देते.

शेखर कपूर यांचा प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्द राहिली आहे. त्यांनी अनेक चित्रपटात काम केलं. शिवाय, अनेक चित्रपट त्यांनी बनवले. एलिझाबेथ, मिस्टर इंडिया, बँडिट क्वीन, आणि मासूम सारख्या चित्रपटांत काम केलं. सध्या कपूर हे त्यांच्या आगामी प्रोजेक्ट “मासूम… द न्यू जनरेशन” मध्ये मग्न असून लवकरच हा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube