Asha Nadkarni: दुःखद! ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Asha Nadkarni Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी (Asha Nadkarni) यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. मुख्य म्हणजे मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये आपल्या अभिनय कौशल्य सिद्ध करणाऱ्या आशा यांनी अखेर जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर येताच फिल्म इंडस्ट्रीवर मोटजी शोककळा पसरली आहे. Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की […]

Asha Nadkarni

Asha Nadkarni

Asha Nadkarni Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी (Asha Nadkarni) यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. मुख्य म्हणजे मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये आपल्या अभिनय कौशल्य सिद्ध करणाऱ्या आशा यांनी अखेर जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर येताच फिल्म इंडस्ट्रीवर मोटजी शोककळा पसरली आहे.

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

या बरोबरच त्यांचे अनेक चाहते सोशल मिडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.  आशा नाडकर्णी यांचा जन्म दक्षिण मुंबईतील सारस्वत कॉलनीत राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे. आशा नाडकर्णी या एक उत्तम नृत्यांगना होत्या. साधारण १९५७ ते १९७३ पर्यंत आशा यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमामध्ये अतिशय चांगले काम केले आहे.

आशा यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. अभिनेत्री आशा नाडकर्णी यांनी ५० ते ७० च्या दशकामध्ये बॉलिवूड अभिनेते सुनील दत्त, किशोर कुमार, अभिनेत्री आशा पारेख, शर्मिला टागोर अशा प्रसिद्ध कलाकारांबरोबर काम केले होते. मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील दमदार अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते.

आशा नाडकर्णी या नवरंग, गुरु और चेला, चिराग, फरिश्ता, श्रीमानजी, दिल और मोहब्बत, अलबेला मस्ताना, बेगुनाह अशा अनेक सिनेमामध्ये  त्यांनी काम केले आहे.

Exit mobile version