Download App

Vivek Oberoi Birthday : ‘चंदू’ पासून क्रिशचा ‘काल’; विवेकनं गाजवलं ‘बॉलिवूड’

Vivek Oberoi Birthday :  हिंदी चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या कंपनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा विवेक ओबेरॉय एकेकाळी टॉप अभिनेत्यांत गणला जात होता. मात्र, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात विवेक इतका गुंतला की यशाचे शिखर गाठणे त्याला जमलेच नाही. तरीही विवेक ओबेरॉय अजूनही हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख ठेऊन आहे. रोमांस, फॅमिली ड्रामा, कॉमेडी, अॅक्शन अशा प्रत्येक प्रकारच्या भूमिका त्याने साकारल्या. आज 3 सप्टेंबर बॉलिवूडमधील या हरहुन्नरी अभिनेत्याचा (Vivek Oberoi Birthday) जन्मदिन. यानिमित्त त्यांच्या काही गाजलेल्या भूमिकांबद्द माहिती घेऊ या..

चंदू (कंपनी)

सन 2002 मध्ये रिलीज झालेल्या कंपनी या चित्रपचटातून विवेकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या पहिल्याच सिनेमात चंदू नावाच्या पात्रात विवेकने जीव ओतला. त्याच्या अभिनयाने सगळ्यांनाच चकीत केले. या चित्रपटातील अभिनयाबद्दल विवेकला बेस्ट मेल डेब्यू अॅक्टर आणि सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता पुरस्कार मिळाला.

आदित्य (साथिया)

2002 या वर्षात विवेकने साथिया या रोमँटिक ड्रामा चित्रपटात काम केले. राणी मुखर्जी आणि विवेक यांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. साथिया हा सिनेमा विवेकच्या बेस्ट सिनेमांच्या यादीत आहे. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअर अवार्ड्समध्ये बेस्ट अॅक्टरसाठी नामांकन मिळाले.

Gashmir Mahajani: गश्मीर महाजनी पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत झळकणार; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

युवा

मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला युवा हा चित्रपट राजनीतिक थ्रिलर चित्रपट होता. सन 2004 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात विवेकने अर्जुन बालचंद्रनची भूमिका साकारली होती. या चित्रपटात पदवीधर विद्यार्थ्यांचा राजकारणातील प्रवेश आणि निवडणुका यांवर भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटात अजय देवगन, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, एशा देओल, करीना कपूर यांच्याही भूमिका होत्या.

मीत (मस्ती)

निर्देशक इंद्र कुमार यांचा मस्ती हा चित्रपट 2004 मध्ये रिलीज झाला. विवेक ओबेरॉय, आफताब शिवदासानी, रितेश देशमुख मुख्य भुमिकेत होते. हा एक कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटाच्या माध्यमातून विवेकने हे सिद्धे केले की तो फक्त गंभीर भुमिकाच नाही तर लोकांना हसविण्यातही माहीर आहे.

टायगर जिंदा है…’Tiger 3’चं पहिलं पोस्टर आऊट! भाईजान- कतरिनाच्या लूकने वेधलं लक्ष

केसु किंवा केशव (ओमकारा)

सन 2006 मध्ये ओमकारा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात विवेकने केशव उर्फ केसु फिरंगीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी विवेकला सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

माया डोलास (शूटआउट अॅट लोखंडवाला)

सन 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विवेकने गँगस्टर माया डोलासची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भुमिकेचे मोठे कौतुक झाले. विवेकच्या कारकिर्दितील हा चित्रपट अविस्मरणीय असाच आहे.

काल (क्रिश 3)

सन 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या क्रिश 3 या चित्रपटात विवेकने नकारात्मक भूमिका साकारली. यातील त्याचा परफॉरमन्स हा अन्य चित्रपटांतील कामाच्या तुलनेत अगदीच वेगळा होता. हा रोल सुपर व्हिलनचा होता. या चित्रपटात सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता पुरस्कारासाठी त्याला नामांकनही मिळाले.

Tags

follow us