Download App

Salman Khan: सलमान खानला हायकोर्टाचा दिलासा

Salman Khan: अभिनेता सलमान खानला (Salman Khan) २०१९ मधील प्रकरणात मुंबई हायकोर्टाने (High Court) दिलासा दिला. २०१९ मध्ये एका पत्रकाराला मारहाण प्रकरणी डी.एन. नगर पोलीस ठाण्यात सलमानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Entertainment) या प्रकरणावर आज सुनावणी झाली. हे संपूर्ण प्रकरणच हायकोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे. (BOLLYWOOD) यामुळे सलमानला या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

सलमान खान अंधेरी परिसरात सायकल चालवत असताना एका पत्रकाराने त्याचे शूटिंग केले होते. हे शूटिंग त्याने युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यासाठी केले होते. हे प्रकरण लक्षात येताच सलमान आणि त्याच्या सुरक्षारक्षकाला ही बाब आवडली नाही. यामुळे सलमान आणि त्याच्या सुरक्षारक्षकाने त्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली अशी तक्रार पत्रकार अशोक पांडे यांनी अंधेरीच्या डी.एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. हे प्रकरण जेव्हा कोर्टात पोहोचलं तेव्हा कोर्टाने समन्स जारी करुन सलमानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले.

या संपूर्ण प्रकरणी सलमान खानला आणि त्याच्या सुरक्षारक्षकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या दोन्ही याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी करण्यात आली. कोर्टाने दोन्ही याचिकांचा स्विकार करत हे संपूर्ण प्रकरण कोर्टाने रद्द केले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. हायकोर्टाने सलमान खानच्या विरोधात हे संपूर्ण प्रकरण रद्द केलं आहे, त्यामुळे आता सलमानला कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

Adipurush : संस्कृतीच्या नावावर हे काय? ‘आदिपुरुष’च्या नवीन पोस्टरवर चाहते नाराज

अभिनेता सलमान खान हा चित्रपटांबरोबरच तो नेहमीच चर्चेत असतो. सलमान खानला गेल्या काही दिवसांपूर्वी ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी जोधपूर येथून आरोपी धाकड राम बिश्नोईला (Dhakad Ram Bishnoi) याला अटक केली आहे. सलमानला याअगोदर देखील एका पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती. सलमानचे लवकरच काही आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याचे प्रेक्षकांच्या भेटीस काही चित्रपट लवकरच येणार आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’, ‘टायगर-3’ हे चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहेत. तसेच तो किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या हे चितपट लवकरच भेटीला येणार आहेत.

Tags

follow us