Download App

Boys 4 : गावची ओढ लावणारं ‘गाव सुटना’ गाणं प्रदर्शित!

Boys 4 : Boys 4 चित्रपटातलं टायटल गाणं ‘गाव सुटना’ नूकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हे गाणं पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आपल्या मूळगावी घेऊन जाणारं हे भावनिक गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गणेश शिंदे यांनी शब्दबद्ध केलेल्या गाण्याला गायक अवधुत गुप्ते यांचं संगीत लाभलं असून प्रतिक लाड आणि ऋतुजाने चित्रित केलं आहे. तर पद्मनाभ गायकवाड यांनी हे गाणं गायलं आहे.

‘इंग्रजांची चाकरी केल्यानेच ‘ठाकूर’ पदवी… त्यांच्यात इंग्रजांचाच डीएनए’; अनिल बोडेंची जीभ घसरली

‘गाव सुटंना`हे मनाला भारावणारे गाणं आपल्या गावच्या आठवणी ताज्या करणारे असून आपल्या मातृभूमीपासून दूर परदेशात राहणाऱ्या प्रत्येकाला जवळचे वाटेल, असं गाणं आहे. प्रत्येक ओळीत भावना दडलेल्या आहेत. त्यामुळे रॅप साँगनंतर प्रेक्षकांना हे गाणेसुद्धा नक्कीच आवडणार असल्याची भावना अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केली आहे.

Israel Hamas War: युद्धामुळे सोने-चांदी महाग होणार ? शेअर बाजारालाही फटका!

जगाच्या पाठीवर माणूस कुठेही गेला, तरी त्याची नाळ आपल्या गावाशी, जन्मभूमीशी कायम जोडलेली असते, ते प्रेम कधीच कमी होत नाही. हे गाण्यातून प्रतिक सांगत आहे. आपल्या गावाचे सुंदर वर्णन तो या गाण्यातून करत आहे. तिथे रमत असतानाच आपल्या गावातील आठवणी तो मनात जपल्या असल्याचे सांगत आहे. परदेशात राहणाऱ्यांना आपल्या गावाची ओढ लावणारे हे गाणे आहे.

महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांची शक्यता संपुष्टात; पुणे-चंद्रपूरचे बिगुल नव्या लोकसभेसोबतच वाजणार

दरम्यान, सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केलं आहे.

20 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Tags

follow us