Boys 4’ चा चौपट धमाका; धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Boys 4 Teaser Out: विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ (Boys 4 Teaser) या मराठी सिनेमाचे भन्नाट ट्रेलर सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला आहे. (Marathi cinema) गेल्या काही दिवसांपूर्वी या कलाकारांचे पोस्टर झळकले होते. यामध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, […]

Boys 4 Teaser Out

Boys 4 Teaser Out

Boys 4 Teaser Out: विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ (Boys 4 Teaser) या मराठी सिनेमाचे भन्नाट ट्रेलर सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला आहे. (Marathi cinema) गेल्या काही दिवसांपूर्वी या कलाकारांचे पोस्टर झळकले होते. यामध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या मुख्य भूमिका बघायला मिळणार आहे. यामुळे एकंदरीत ही सगळी मंडळी कल्ला करणार हे निश्चितच आहे.


बॅाईज, बॅाईज २ आणि बॅाईज ३ मधील धैर्या, ढुंग्या आणि कबीरची मैत्री आपल्या सर्वांना चांगलच माहित आहे. या मैत्रीने अवघ्या महाराष्टामध्ये जोरदार धुमाकुळ घातला होता. परंतु टिझरमध्ये त्यांच्या या मैत्रीमध्ये आता दरार आल्याचे बघायला मिळत आहे. आता ही मैत्री संपुष्टात येणार की त्यांची ही गॅंग आणखी वाढणार असल्याचे लवकरच प्रेक्षकांना येत्या २० ॲाक्टोबर दिवशी बघायला मिळणार आहे. एवढे मात्र नक्की आहे की, हे अफलातून कलाकार यंदा पुन्हा एकदा जोरदार धिंगाणा घालणार आहे.

दिग्दर्शक विशाल देवरू खकर याने सांगितले आहे की, ‘या तिघांच्या मैत्रीची सुरूवात, चांगल्या, वाईट प्रसंगी एकमेकांना दिलेली साथ, थट्टामस्करी आणि याअगोदरच्या तीन भागांमध्ये सर्वांनी बघितलेली आहे. परंतु आता या मैत्रीमध्ये एक नवा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ’बॉईज’ च्या प्रत्येक भागाने चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केले आहे. सिनेमातील कलाकार तेच असले तरी प्रत्येक वेळी आम्ही चाहत्यांसाठी कथेत वेगवेगळे वळणे आणली आहेत. यावेळी देखील असेच काहीतरी भन्नाट सरप्राईज मिळणार आहे.

Kiran Mane: ‘न झुकता पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा अन्…’, किरण मानेंची किंग खानसाठी खास पोस्ट

तसेच आता आणखी जबरदस्त कलाकार सामील झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे आता ही धमाल चौपट झाली आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या सिनेमाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर या सिनेमाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version