Kiran Mane: ‘न झुकता पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा अन्…’, किरण मानेंची किंग खानसाठी खास पोस्ट

Kiran Mane: ‘न झुकता पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा अन्…’, किरण मानेंची किंग खानसाठी खास पोस्ट

Kiran Mane Post : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मिडीयावर (Social media) मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मिडीयावरील त्यांच्या पोस्ट चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांच्या फेसबुक (Facebook) अकाउंटवर किरण यांनी किंग खानसाठी खास पोस्ट केली आहे. त्यांच्या स्ट्रगल काळात एका अभिनेत्याकडून कशी प्रेरणा मिळाली याबद्दल या पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टमध्ये मानेंनी किंग (King Khan) खानचे तोंडभरून कौतुक करत त्याची एक सवय सांगितली आहे.


न झुकता पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा आणि कुठं नम्रपणे झुकायचं, हे ज्याला कळलं… त्यानं जग जिंकलं !
परवा एका सी ग्रेड सिनेमा दिग्दर्शकाचा इंटरव्ह्यू पाहिला, ज्यात तो सांगत होता शाहरूख कधी कुणाला नमस्कार करत नाही, ‘सलाम’ करतो… आणि हा प्रसंग डोळ्यापुढे आला. आजकाल असत्य पेरून नफरत पसरवणारे सुमार दर्जाचे कलावंत मराठीतही आहेत आणि हिंदीतही. अशांनी गढुळ केलेल्या कलाक्षेत्रात शाहरूखसारखे लोक ‘प्युरीफायर’ आहेत. लब्यू SRK.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)


किरण मानेंची किंग खानसाठी खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. या पोस्टमध्ये मानेंनी किंग खानचे तोंडभरून कौतुक करत असल्याचे बघायला मिळत आहे. किरण मानेंच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

Sharad Ponksheनी सांगितला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचा ‘तो’ किस्सा; म्हणाले, ‘नाटकाची बस जाळली…’

किरण मानें कामाबद्दल सांगायचं झालं तर ‘मुलगी झाली हो’ या सिरियलमधून घराघरात पोहोचलेले अभिनेते कायम चर्चेत असतात. या सिरियलमधून अचानक झालेल्या एक्झिटनंतर किरण माने अधिक प्रसिद्धीझोतात आल्याचे पाहायला मिळते. यानंतर त्यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून चाहत्यांचा चांगलंच मनोरंजन केलं होत. सध्या ते वेगवेगळ्या विषयांवर लिहित असताना दिसतं आहे. किरण मानेंनी नुकतीच बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानसाठी एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच ते सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube