Breaking Bad Actor RJ Mitte Death: वेबसीरीज प्रेमींनी ‘ब्रेकिंग बॅड’ ही सीरिज पाहिलीच असेल. याच सीरिजमधील एका अभिनेत्याने आपले जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. ‘ब्रेकिंग बॅड’ सीरिजमध्ये ‘वॉल्टर व्हाईट ज्युनियर’ची भूमिका साकारणारा अभिनेता आरजे मिटे (RJ Mitte) याचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन झाले आहे. त्याने आपले जीवन संपवले, असे ‘पीपल’ मासिकाने दिलेल्या वृत्तात आहे. त्याच्या टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अत्यंत दुःखद अंतःकरणानं आम्ही आरजे मिटेच्या निधनाची बातमी कळवत आहोत, जो एक लोकप्रिय अभिनेता, समाजसेवक आणि दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी लढणारा कार्यकर्ता होता.”
UPI पेमेंटवर शुल्क लागू होण्याची तारीख बदलली; दिवाळीनंतरच MDR लागू होणार, NPCI ची घोषणा
आरजे मिटेला ‘ब्रेकिंग बॅड’ या टेलिव्हीजन सीरिजने जगभरात ओळख मिळाली. सीरिजमधील त्याने साकारलेल्या भुमिकेप्रमाणेच त्याला ‘सेरेब्रल पाल्सी’ हा आजार होता. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याला हा आजार होता.
Viral Story : पहिल्या डेटवर लाखोंचा खर्च, दुसऱ्याच दिवशी तरुणीचा नकार कारण काय तर, टंXXल
तो स्वतः अपंग असल्याने त्याने दिव्यांगाच्या अधिकारासाठीही काम करायचं ठरवलं. सिनेमा, टीव्ही सीरिज आणि टीव्ही शोमध्ये दिव्यांगांना योग्य पद्धतीने दाखवलं जावं, यासाठी तो प्रयत्न करायचा. त्याची ‘मिट्टे फाउंडेशन’ नावाची संस्था होती, या संस्थेमार्फत दिव्यांगांना जागरुक करणं आणि त्यांना मदत करण्याचं काम केलं जात असे. आरजे मिट्टे या संस्थेचा चेअरमनही होता.
आयफोन वापरणाऱ्यांचा स्वभाव कसा असतो? रंजक माहिती एकदा वाचाच…
मात्र त्याच्या या निधनाने त्याच्या चाहत्यांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान आरजे मिटेची ब्रेकिंग बॅड ही सीरिज ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटीवर पाहायला मिळेल.
