Download App

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया ठरली भारतातील सर्वात बँकबेल स्टार!

Tamannaah Bhatia: 2023 हे संपूर्ण वर्ष तमन्ना भाटियासाठी (Tamannaah Bhatia) सर्वात महत्त्वाचे वर्ष ठरले आहे. (Social media) गेल्यावर्षी सर्वात सगळ्यात बझ्झमध्ये राहणारी अभिनेत्री म्हणून तमन्ना ओळखली जाते. या बाहुबली (Baahubali) अभिनेत्रीचे तीन हिंदी ओटीटी (OTT), दोन थिएटर रिलीझ आणि एक गाण होते, ज्याने संपूर्ण जग तिच्या पावलांवर थिरकताना पाहायला मिळाला आहे.

तमन्नाने केवळ OTT प्लॅटफॉर्मवरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही प्रेक्षक आणि चाहत्यांना आपलंसं केलं. रॅम्प वॉक करून जपानी ब्रँड शिसेडोचा पहिला चेहरा बनली. 2023 च्या लँडस्केपमध्ये तमन्नाने एक उल्लेखनीय प्रवास सुरू केला आणि तो अखंड सुरू राहिला. तमन्ना भाटियाने एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून भारतीय चित्रपट उद्योगात तिची जागा तिने मजबूत केली असून प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याच्या तिच्या अपवादात्मक क्षमतेसाठी ती ओळखली जाते.

अभिनयाच्या पलीकडे तमन्ना एक फॅशन आयकॉन बनली आहे ज्याने आंतरराष्ट्रीय ब्रँडचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे यश सिनेमा आणि OTT या दोन्ही प्लॅटफॉर्मवर पसरलेले आहे. जे तिची प्रतिभा आणि अटूट वचनबद्धतेवर प्रकाश टाकते. तमन्ना 2024 मध्ये निखिल अडवाणीच्या हिंदीतील वेदामध्ये जॉन अब्राहम सोबत अभिनय करत आणि तमिळ चित्रपट अरनामनाई 4 मध्ये दिसणार आहे.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. अद्याप त्यांनी त्यांचं नातं अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. ‘लस्ट स्टोरीज 2’ या वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान त्यांनी एकत्र काम केलं होतं. या सीरिजमधील त्यांच्या बोल्ड सीन्सची जोरदार चर्चा रंगली होती.

Munawar Faruqui : उद्ध्वस्त आयुष्याचा कारभारी ते बिग बॉसचा विजेता

एका मुलाखतीच्या दरम्यान तमन्नानं लस्ट स्टोरीज-2 सिनेमातील विजयसोबतच्या इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबद्दल सांगितलं,”एखाद्या अभिनेत्यासोबत काम करताना मला इतके सुरक्षित कधीच वाटले नाही आणि ही गोष्ट एका अभिनेत्यासाठी खूप महत्त्वाचे असते. तुम्हाला काम करताना अशा प्रकारची सुरक्षितता जाणवली पाहिजे, विशेषतः अशा सिनेमात. त्याच्यामुळे मला इतके सुरक्षित वाटले की, त्या सीनमध्ये मी काही बोलण्यास, काहीही करण्यास, विशिष्ट प्रकारे भावना व्यक्त करण्यास घाबरले नाही. त्याने मला हे सर्व सोपे करुन दिले. त्यामुळे ही त्याची गोष्ट मला नक्कीच आवडणारी आहे”.

follow us