Download App

Animal Teaser Release Date: रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’च्या टीझरबद्दल मोठी अपडेट; ‘या’ दिवशी होणार रिलीज?

Animal Teaser: ‘तू झुठी मैं मक्कर’ (Tu Jhoothi Main Makkaar) नंतर अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘ॲनिमल’ (Animal) सिनेमामुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा प्रदर्शनाच्या तारखेमुळे जोरदार चर्चेत आला आहे. ‘गदर २’ आणि ‘OMG 2’ यांच्याबरोबर हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार होता. परंतु दोन्ही सिनेमाची बॉक्स ऑफिसवर होणारी चर्चा बघता, निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या तारखेमध्ये बदल केल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सिनेमाचा टीझर येत्या २८ सप्टेंबर दिवशी  प्रदर्शित करण्यात येणार आहे.


गेल्या काही दिवसापासून सिनेमाची एक झलक अर्थात प्री- टीझर सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासून चाहत्यांना  सिनेमाबद्दलची मोठी क्रेझ चाहत्यांना प्रेक्षकांमध्ये बघायला मिळत आहे. सध्या निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या तारखेमध्ये बद्दल केला आहे. सिनेमा या वर्ष अखेरीस अर्थात १ डिसेंबर दिवशी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेमाबद्दल प्रत्येक अपडेटवर चाहते लक्ष देऊन आहे. रणबीर कपूरबरोबर (Ranbir Kapoor) सिनेमामध्ये नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी या कलाकारांच्या मुख्य भूमिका बघायला मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाच्या टीझरबद्दल नुकतीच नवीन अपडेट समोर आली आहे. येत्या २८ सप्टेंबर दिवशी या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिनेमाचा टीझर अभिनेता रणबीर कपूरच्या वाढदिवशी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिनेमाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी असून ते सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यावर सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनला निर्मात्यांसह दिग्दर्शक आणि कलाकार २ महिने अगोदरच प्रमोशनला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Box Collection: ‘’जवान’ने रचला इतिहास! चौथ्या दिवशीच्या कमाईने गाठला उच्चांक

गेल्या काही दिवसापासून चाहत्यांमध्ये या सिनेमात रणबीरबरोबर परिणीती चोप्रा बघायला मिळणार असल्याची जोरदार चर्चा होत होती. परंतु  सिनेमामध्ये रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. पहिल्यांदा सिनेमामध्ये, रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना ही जोडी एकत्र बघायला मिळणार आहे. दरम्यान टीझर नक्की, २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार का?, अद्याप याबद्दलची माहिती स्पष्ट झाली नाही. टीझरबद्दलची माहिती चाहत्यांना, रणबीरच्या वाढदिवशी मिळणार असल्याचे दिसत आहे.

Tags

follow us