Box Collection: ‘’जवान’ने रचला इतिहास! चौथ्या दिवशीच्या कमाईने गाठला उच्चांक

Box Collection: ‘’जवान’ने रचला इतिहास! चौथ्या दिवशीच्या कमाईने गाठला उच्चांक

Jawan Box Office Collection: किंग खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ची (Jawan) सध्या जोरदार चर्चा होत आहे. प्रदर्शनाच्या अगोदरपासूनच प्रकाशझोतात राहिलेल्या या सिनेमाला प्रदर्शित होऊन ४ दिवस झाले. (Box Office Collection) तसेच सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला आज देखील चाहत्यांचा मोठा प्रतिसाद बघायला  मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)


प्रदर्शनाच्या अगोदर आणि प्रदर्शनाच्या नंतर देखील सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला (Advance booking) चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाने पहिल्या तीन दिवसामध्ये २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. पहिल्या विकेंडला सिनेमाला चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. चला तर मग जाणून घेऊया सिनेमाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईबद्दल….

किंग खान आणि नयनताराच्या ‘जवान’ला चाहत्यांकडून पहिल्या दिवशी तब्बल १० सिनेमाच्या कमाईचा आकडा पार करत हिट सिनेमाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमाची चर्चा फक्त राज्यातच नाही तर, जगभरात होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाने चौथ्या दिवशी आणि विकेंडच्या पहिल्या रविवारी तब्बल ८१ कोटींचा गल्ला कमावला आहे. जबरदस्त स्टारकास्ट, उत्तम अभिनय, दमदार कथा अशी विविध केमिस्ट्री चाहत्यांना सिनेमामध्ये बघायला मिळत आहे. सिनेमामध्ये असलेल्या धमाकेदार सीन्समुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. यामुळे चौथ्या दिवशी देखील ‘जवान’ची छप्परफाड कामगिरी बॉक्स ऑफिसवर बघायला मिळत आहे. सिनेमाने चौथ्या दिवशी एकूण ८१ कोटींची कमाई केल्याचे बघायला मिळत आहे.

Riteish Deshmukh: रितेश देशमुखने घेतला देशाच्या नावांबद्दल पोल; चाहत्यांनी दिली ‘या’ नावाला पसंती?

हिंदी भाषेमध्ये सिनेमाने ७२ कोटी आणि उर्वरित तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये सिनेमाने जोरदार कमाई केली आहे. तसेच तिसऱ्या दिवशी सिनेमाने २०० कोटींचा गल्ला गाठला आहे. लवकरच येत्या काही दिवसामध्ये सिनेमा ३०० कोटींचा देखील टप्पा गाठणार आहे. सिनेमाची आतापर्यंत एकूण २८७. ६ कोटींचा आकडा गाठला आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खानने केली आहे. सिनेमा ७ सप्टेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून प्रमुख भूमिकेत शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. तसेच हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube