Download App

Cannes Film Festival 2023 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात; ‘या’ अभिनेत्रीचा रेड कार्पेटवर डेब्यू!

Cannes Film Festival : जगभरातील सेलिब्रेटींसाठी महत्त्वाचा असणाऱ्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात होत आहे.(Cannes Film Festival 2023) 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (hollywood) 16 ते 27 मे या तारखेच्या दरम्यान यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल पार पडणार आहे. (Cannes Film Festival) ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर प्रत्येकवर्षी देशातून अनेक कलाकार येत असतात. याववर्षी देखील अनुष्का शर्मापासून मानुषी छिल्लरपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर एन्ट्री करणार आहेत.


अनुष्का शर्मा यावर्षी देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये शामिल होणार आहे. (Entertainment) चित्रपटसृष्टीतील महिलांचा गौरव केला जाणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अनुष्का सहभागी होणार आहे. या कार्यक्रमामध्ये अनुष्काबरोबरच इतर हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेट देखील सहभागी होणार चर्चा आहे. अनुष्का शर्माबरोबरच मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर ही देखील कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवताना दिसून येणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी, सिने-दिग्दर्शक अनुराग कश्यप कान्समध्ये इत्यादी सेलिब्रिटी या फेस्टिवला हजेरी लावणार आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर डॉली सिंह ही देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणार आहे. ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023’चं आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक चित्रपट दाखवले जाणार आहेत.

Vaibhav Mangale : कुणी कुठे कशी दाद मागावी? नाट्यगृहांच्या दुरावस्थेवर वैभव मांगले भडकले

‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023’मध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी खास ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. तसेच या ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले आहे. महिला कॉकटेल ड्रेस परिधान करू शकतात. ब्लॅक टॉप, ब्लॅक ट्राउजर किंवा भडक रंगाची फॉर्मल ट्राउजर महिला परिधान करू शकणार आहेत. तर दुसरीकडे या पुरुषांना डिनर जॅकेट किंवा सूट परिधान करावे लागणार आहे.

Tags

follow us