Download App

‘चंदीगढ करे आशिकी’ चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण! अभिषेक कपूरने शेअर केली भावनिक पोस्ट

Chandigarh Kare Aashiqui 2 years completed: दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या (Abhishek Kapoor) “चंदीगढ करे आशिकी” (Chandigarh Kare Aashiqui Movie) या चित्रपटाला 2 वर्ष पुर्ण झाली असून दुसरा या चित्रपटांनी नेहमीच सगळ्यांना प्रभावित केलं. उत्तम दिग्दर्शन आणि अभिषेक कपूर यांच्या उत्तम कथा आणि एक हृदयस्पर्शी प्रेमकथा त्यांनी या चित्रपटात मांडली होती.

“रॉक ऑन!!’, ‘काई पो चे’ आणि “केदारनाथ’, ‘चंदीगढ करे आशिकी’ या अभिषेक कपूरच्या अनोख्या दिग्दर्शित चित्रपटाची कायम चर्चा झाली कथाकथनाचे आणि भावनांना सुंदरपणे मिश्रण हे त्यांना कायम कॅप्चर करता आला आहे.

चित्रपटाची 2 वर्ष होताना अभिषेक कपूरने सांगितलं आहे की, “चित्रपट रिलीज होऊन 2 वर्षे झाली आहेत. समाजातील ‘त्या’ विचारांना प्रकाश टाकणारी ही कथा शेअर केल्याबद्दल मला कायम अभिमान वाटतो. LGBTQAI+ समाजासाठी असलेला हा चित्रपट एक अनोख्या उंचीवर गेला आणि प्रेक्षकांनी त्याला प्रेम दिलं. अशी भावनिक पोस्ट यावेळी केली आहे.

Animal Box Office Collection: रणबीरच्या ‘अॅनिमल’ची छप्परफाड कमाई! नऊ दिवसांत 660 कोटींचा गल्ला

सिनेमॅटिक अनुभव आणि उत्कृष्ट चित्रपटाची 2 वर्षे साजरी करत असताना अभिषेक कपूर आगामी काळात अनेक उत्तोत्तम चित्रपट करणार आहेत. या कल्ट क्लासिक चित्रपटाची सुपरहिट 2 वर्ष पुन्हा एकदा चित्रपटाच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन जाणार आहेत.

अभिषेक कपूरच्या चंदीगढ करे आशिकी 2 वर्ष हा उत्तम निर्णय ठरला. दिग्दर्शक सध्या त्याच्या पुढच्या प्रोजेक्टवर काम करत आहे जिथे तो अजय देवगणचा पुतण्या आमन देवगन आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी या 2 नवीन स्टारकिड्सला लाँच करणार आहे.

Tags

follow us