Animal Box Office Collection: रणबीरच्या ‘अॅनिमल’ची छप्परफाड कमाई! नऊ दिवसांत 660 कोटींचा गल्ला

  • Written By: Published:
Animal Box Office Collection: रणबीरच्या ‘अॅनिमल’ची छप्परफाड कमाई! नऊ दिवसांत 660 कोटींचा गल्ला

Animal Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. दिवसेदिवस या सिनेमाच्या कमाईचा आकडा वाढतच आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई कर आहे. रिलीजच्या ऩऊ दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर 660.89 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Jayant Patil : ‘साहेब तुम्ही पण या, हजार कोटींच्या आत काही नाही इकडं’; जयंत पाटलांच्या तोंडी ‘BRS’ चे किस्से! 

बहुचर्चित अ‍ॅनिमल हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित झाला. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर हिंसक लूकमध्ये दिसत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. रणबीरसोबत ‘अ‍ॅनिमल’मध्ये रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल, शक्ती कपूर, तृप्ती डिमरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अॅनिमल चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटगृहांच्या बाहेर हाऊसफुल्लचे फलक लावण्यात आले आहेत. प्रदर्शनापूर्वीच अ‍ॅनिमलने अॅडव्हान्स बुकिंगमधून भरघोस कमाई केली होती. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली. आता या चित्रपटाने नऊ दिवसांत जगभरात 600 कोटींहून अधिक कमाई केली.

‘पैशाचं अन् माझं जमत नाही, म्हणूनच मी..,’; मनोज जरांगेंनी ठणकावून सांगितलं 

कमाई किती-
पहिला दिवस : 63.8 कोटी
दुसरा दिवस : 66.27 कोटी
तिसरा दिवस: 71.46 कोटी
चौथा दिवस: 43.96 कोटी
पाचवा दिवस: 37.47 कोटी
सहावा दिवस 30.39 कोटी
सातवा दिवस: 24.23 कोटी
आठवा दिवस: 23.50 कोटी
नववा दिवस: 37 कोटी
एकूण कमाई: 398.53 कोटी (भारतातील कमाई)

अत्यंत हिंसक आणि क्रूर दृश्यांसाठी या चित्रपटावर टीका होत आहे. मात्र असे असूनही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. अॅनिमलची स्पर्धा विकी कौशलच्या ‘साम बहादूर’शी आहे. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण कमाईच्या बाबतीत रणबीरच्या अॅनिमलने बाजी मारली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube