Jayant Patil : ‘साहेब तुम्ही पण या, हजार कोटींच्या आत काही नाही इकडं’; जयंत पाटलांच्या तोंडी ‘BRS’ चे किस्से!

Jayant Patil : ‘साहेब तुम्ही पण या, हजार कोटींच्या आत काही नाही इकडं’; जयंत पाटलांच्या तोंडी ‘BRS’ चे किस्से!

Jayant Patil on BRS : ‘तेलंगणात कष्टानं काँग्रेस जिंकली. त्यांचा (Telangana Election 2023) जो विरोधी पक्ष होता बीआरएस. प्रचंड साधनं असणारा पक्ष होता. या पक्षात मध्यंतरी आपल्याकडील नांदेड भागातील काही कार्यकर्ते गेले. एक दोन जण ज्यांना आपण विधानसभेचं तिकीट देणार ते पण गेले. एक तर बहाद्दर तिकडं गेल्यावर मला म्हणाला ‘साहेब तुम्ही पण या हजार कोटींच्या आत इकडं काही नाही. त्या पक्षात जे कुणी गेले होते त्यांना काहीतरी आश्वासनं दिली गेली होती. अशी काही उदाहरणं माझ्याकडं आहेत. एक जणाला सांगण्यात आलं आमचे सीएम साहेब येणार आहेत तुम्ही जेवण तयार करा. हातांची पाचं बोट दाखवत म्हणाले एवढे पाठवतो. नंतर एक बोट दाखवत म्हणाले एवढे आले. उरलेले परत आलेच नाहीत. साहेब, येऊन गेले परत फोन केला तर साहेब फोनच घेत नाहीत’, असे भारत राष्ट्र समितीचे खास किस्से जयंत पाटील यांनी ऐकवले अन् उपस्थितांतही चांगलाच हशा पिकला.

जयंत पाटील काल सांगली दौऱ्यावर होते. शहरातील माहेश्वरी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्रात आलेल्या भारत राष्ट्र समितीचे खास किस्से जयंत पाटील यांनी उपस्थितांना ऐकवत त्यांचे चांगलेच मनोरंजन केले.

Jayant Patil : राष्ट्रवादी फोडण्याचा एका पक्षाचा ‘बीआरएस’ला आदेश; जयंत पाटलांचा निशाण्यावर भाजप ?

पाटील पुढे म्हणाले, ‘काल परवा मराठवाड्यातील मनसेचे कार्यकर्ते जे बीआरएसमधून मनसेत आले होते त्यांना भेटलो. त्यांनी मला सांगितलं साहेब कसं आहे आपण सांगितलं की पक्षात येतोय म्हटल्यावर ते विचारतात कोणत्या विमानानं येणार. मग त्या विमानतळावर गाडी पाठवली जाते. थेट फाइव्ह स्टार हॉटेल मध्ये रुम बूक केली जाते. मग तिथं अंघोळ करून रेडी झालं की मग म्हणतात की सीएम साहेब वाट पाहत आहेत लवकर या. मग साहेबांना भेटायला गेल्यानंतर साहेब लगेच म्हणतात, ‘इसको महाराष्ट्र पार्टी का प्रदेश अध्यक्ष बना दो. एक इनोव्हा गाडी दो, खर्चे का इंतजाम करो. बाकी कुछ नहीं आप जो कहेंगे वो कर देंगे.’ असं म्हटल्यानंतर समोरचा खुश त्याला कुठं पैसे खर्च करायचे आहेत. पुन्हा माघारी आल्यावर फोन केला की कुणी फोनच घेत नाही. हा अनुभव त्यांची (बीआरएस) तेलंगणात सत्ता असतानाचा आहे.’

राष्ट्रवादी फोडण्याचा एका पक्षाचा आदेश 

त्यामुळे आपल्या राज्यातून अधीर होऊन तिकडे गेलेले अनेक लोक असे हवेत होते की बीआरएस खूप स्पीडमध्ये असल्याचं वाटायचं. पण ते का स्पीडमध्ये होते याचं कारण म्हणजे, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनता शरद पवार यांना साथ देण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी शरद पवार यांच्या बाजूने आहेत त्यांची मतं कापायला. काँग्रेसचं कुणी फुटलेलं नाही. पण जेवढी राष्ट्रवादीची फोडता येतील तेवढी फोडा असं दुसऱ्या पक्षानं सांगितलेलं होतं. तो दुसरा पक्ष त्यांना म्हणत होता की महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मतं कापा. पण ज्यावेळी एनसीपीच तुटली त्यावेळी बीआरएसची डिमांड कमी झाली. आता पक्षच फुटला म्हटल्यानंतर यांना कोण विचारतं?, म्हणून बीआरएसची किंमत कमी झाली, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Jayant Patil : मुख्यमंत्रिपद जाणार म्हणून शिंदेंचं कुणी ऐकत नाही; जयंत पाटलांनी सांगितली ‘अंदर की बात

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube