Telangana Election : तेलंगणात विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारा जायंट किलर कोण?

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 12 03T171215.137

Telangana Election result 2023 | तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( Chandrashekhar Rao ) व काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व मुख्यमंत्री पदाचे उमेदवार रेवंत रेड्डी ( Revant Reddy ) या दोघांचा पराभव करुन कामारेड्डी विधानसभेतून भाजपचे वेंकट रमण रेड्डी ( Venkat Raman Reddy ) विजय होत जायंट किलर ठरले आहे. कामारेड्डी विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून महाराष्ट्रातील अक्कलकोट विधानसभेचे आमदार व भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती.

विजयामागे सोलापूरच्या सचिन कल्याणशेट्टींचा मोठा वाटा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व मुख्यमंत्री पदाचे उमेदवार रेवंत रेड्डी या दोघांचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या वेंकट रमण रेड्डी यांच्या विजयामध्ये सोलपूरच्या सचिन कल्याणशेट्टींचा मोठा वाटा आहे. जबाबदारी मिळाल्यानंतर कल्याणशेट्टी यांनी रेड्डी यांच्या मतदारसंघात तब्बल दोन महिने तेथेच तळ ठोकला होता. याकाळात त्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, सभा घेत पूर्ण प्रचार यंत्रणा राबविली होती. त्यामुळे रेड्डी यांचा आज झालेल्या विजयामध्ये कल्याणशेट्टी यांनी वेंकट रमण रेड्डी विजयी करत जायंट किलर ठरवले आहे.

कामारेड्डी म्हणजे व्हीआयपी सीट 

तेलंगणाच्या कामारेड्डी विधानसभेची ही जागा व्हीआयपी सीट मानली जाते. आता पार पडलेल्या विधानसभेसाठी विद्यमान मुख्यमंत्री केसीआर आणि तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष आणि भावी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या रेवंत रेड्डी यांनी या जागेवरून निवडणूक लढवली होती. तर भाजपने कट्टीपल्ली वेंकट रमण रेड्डी यांना उमेदवारी दिली. या दोन्ही दिग्गजांना पराभूत करण्याचे आव्हान भाजप समोर होते. मात्र, कट्टीपल्ली वेंकट रमण रेड्डी यांनी दोघांचा परभव करत सर्वांनाच चकित केले आहे.

2018 मध्ये टीआरएसने जिंकली होती जागा

2018 च्या निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीचे म्हणजेच सध्याच्या भारत राष्ट्र समितीच्या  गम्पा गोवर्धन यांनी ही जागा जिंकली होती. त्यांनी काँग्रेसचे मोहम्मद अली शब्बीर यांचा पराभव केला होता. कमरारेड्डी विधानसभा मतदारसंघ निजामाबाद जिल्ह्यात येतो.

कोण आहेत कट्टीपल्ली वेंकट रमना रेड्डी?

कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी हे 53 वर्षांचे असून ते व्यवसायाने व्यापारी असून त्यांनी फक्त बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. रेड्डी यांच्यावर 11 गुन्हे दाखल असून, त्यांनी कामरेड्डी विधानसभा मतदारसंघात अनेक शाळा आणि रुग्णालये बांधली आहेत. यापूर्वी ते भाजपचे कामारेड्डी विधानसभेचे प्रभारी आणि निजामाबाद जिल्हा पंचायत अध्यक्षही राहिले आहेत. उद्योगपती ते राजकारणी झालेल्या रेड्डी यांनी विद्यमान मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री अशा दोघांचा पराभव करून मोठी खळबळ उडवून दिली आहे.

 

Tags

follow us