Telangana Election Result : ABVP तून सुरुवात, नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश, CM पदाचा चेहरा रेवंत रेड्डी नेमके कोण?
Telangana Election Result : पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये दक्षिणेतील एकमेवर तेलंगणा राज्यातही निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांचे निकाल सध्या जाहीर होत आहेत. अशातच तेलंगणामध्ये(Telangana Election Result) काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून रेवंत रेड्डी(Revant Reddy) यांच्याकडे पाहिलं जात आहे. रेवंत रेड्डी(Revant Reddy) या निवडणुकीत केसीआर (KCR) यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत. निकालानूसार रेवंत रेड्डी केसीआर यांना चांगलीच लढत देत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता तेलंगणात काँग्रेसची सत्ता आल्यास रेवंत रेड्डीच मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचं दिसून येत आहे.
Horoscope Today: ‘कर्क’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
रेवंत रेड्डी यांची कारकीर्द :
रेवंत रेड्डी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1967 रोजी अविभाजित आंध्र प्रदेशातील कोंडारेड्डी पल्ली, नगरकुर्नूल येथे झाला. रेवंतच्या वडिलांचे नाव अनुमुला नरसिंह रेड्डी आणि आईचे नाव अनुमुला रामचंद्रम्मा आहे. त्यांचे शिक्षण हैदराबाद येथे ए.व्ही. कॉलेज (उस्मानिया विद्यापीठ) मधून ललित कला शाखेत पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर रेवंतने छापखाना सुरू केला. 7 मे 1992 रोजी रेवंतने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री जयपाल रेड्डी यांची भाची अनुमुला गीता यांच्याशी लग्न केले.
विद्यार्थीदशेत असताना रेवंत रेड्डी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या आरएसएसच्या विद्यार्थी संघटनेत काम करीत होते. 2006 मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि मिडझिल मंडळातून जिल्हा परिषद प्रादेशिक समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 2007 मध्ये आंध्र प्रदेश विधान परिषदेचे सदस्य झाले. या कार्यकाळात त्यांनी तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये, रेवंत यांनी टीडीपीच्या तिकिटावर आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि 6,989 मतांनी विजयी झाला. कोडंगल मतदारसंघातून निवडणूक लढवलेले रेवंत यांनी सलग पाच वेळा काँग्रेसचे आमदार गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव करून पहिल्यांदाच आमदार झाले.
Rajasthan Elections : वसुंधरा राजेंचा अपक्षाला फोन, काँग्रेसही अलर्ट; राजस्थानात काय शिजतंय ?
तेलंगणाच्या स्थापनेपूर्वी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, रेवंत पुन्हा एकदा कोडंगल मतदारसंघातून टीडीपीचे उमेदवार होते. पुन्हा एकदा त्यांनी यावेळी टीआरएसचे उमेदवार असलेल्या गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत रेवंत यांनी 14,614 मतांनी विजय मिळवला होता. यानंतर टीडीपीने रेवंत तेलंगणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले. 25 ऑक्टोबर 2017 रोजी टीडीपीने रेवंत यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना पदावरून काढून टाकले. 31 ऑक्टोबर 2017 रोजी, रेवंत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 20 सप्टेंबर 2018 रोजी, त्यांची तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटी (TPCC) च्या तीन कार्यकारी अध्यक्षांपैकी एक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2018 च्या तेलंगणा विधानसभेत, रेवंत यांनी कोडंगल मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवली. यावेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या रेवंत यांना बीआरएसच्या पटनम नरेंद्र रेड्डी यांच्याकडून पहिला पराभव पत्करावा लागला.
रोज काहीतरी वक्तव्य करणं हा त्यांचा हक्क, पण चुकीचं वक्तव्य केलं तर…; भुसेंनी राऊतांना ठणकावलं
विधानसभा पराभवानंतर रेवंत यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही नशीब आजमावलं. 2019 च्या निवडणुकीत जिंकलेल्या तेलंगणातील काँग्रेसच्या तीन लोकसभा खासदारांपैकी रेवंत एक आहेत. मलकाजगिरी जागेवरील काँग्रेसच्या उमेदवाराने टीआरएसच्या एम राजशेखर रेड्डी यांचा 10 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. रेवंत यांना जून २०२१ मध्ये मोठी जबाबदारी मिळाली. तेलंगणा प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी त्यांनी नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत रेवंत यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. सिद्धीपेट जिल्ह्यातील गजवेल विधानसभा जागेवर ही लढत आहे. निवडणूकीच्या निकालावरुन रेवंत रेड्डी आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे.