रोज काहीतरी वक्तव्य करणं हा त्यांचा हक्क, पण चुकीचं वक्तव्य केलं तर…; भुसेंनी राऊतांना ठणकावलं

  • Written By: Published:
रोज काहीतरी वक्तव्य करणं हा त्यांचा हक्क, पण चुकीचं वक्तव्य केलं तर…; भुसेंनी राऊतांना ठणकावलं

Dada Bhuse : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केलेल्या १७८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे वृत्त प्रसिद्ध केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात भुसेंनी मानहानीचा दावा ठोकला. दरम्यान, राऊत हे जामिनासाठी शनिवारी मालेगाव न्यायालयात हजर राहणार आहेत. यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. यावरून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला. रोज काहीतरी वक्तव्य करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

…म्हणून अनिल देशमुखांचं मंत्रिमंडळातून नाव वगळलं; अजितदादांनी सांगितलं खरं 

आज माध्यमांशी बोलतांना दादा भुसे यांनी सांगितलं की, संजय राऊत यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. त्याचं उत्तरही मी सभागृहात दिल होतं. त्यांच्या विरोधात मालेगाव कोर्टात मी दावा देखील केला आहे. ते आता त्या दाव्याच्या जामिनासाठी येत असतील. संजय राऊत यांना बोलून काहीच फायदा नाही, रोज काहीतरी वक्तव्य करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांनी चुकीचे वक्तव्य केले तर न्यायालयात आपण दाद मागूच असं दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितल.

Maratha Reservation : सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजे भुजबळ; होमग्राउंडमध्ये जरांगेंची पुन्हा टीका 

काही दिवसांपूर्वी अद्वय हिरे यांनी रेणुका सुत्तगरीसाठी एनडीसीसी बँकेकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर हिरे यांनी आपल्याला दादा भुसे अडचणीत आणत असल्याचं वक्तव्य केलं होतं. याविषयी विचारल असता भुसे म्हणाले की, माझ्यावर आरोप करणं हा हिरे यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. आम्ही विरोधक असलो तरी मी सुडाचं राजकारण कधी केल नाही, असं भुसे म्हणाले.

सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. त्यावर मंत्री दादा भुसे यांनीही उत्तर दिले आहे. सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे चांगले आहे पण सरकार कोणाचेही असो, सरकारला आर्थिक बाबींचं सोंग आणता येत नाही. जयंत पाटील यांनी अर्थमंत्रिपदापासून अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा मुद्द्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. पंचनामा करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे, असं भुसे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube