ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुलीवरून घेरणाऱ्या खासदार कोल्हेंनाही पोलिसांचे थेट उत्तर; आपण जबाबदार लोकप्रतिनिधी…

  • Written By: Published:
ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुलीवरून घेरणाऱ्या खासदार कोल्हेंनाही पोलिसांचे थेट उत्तर; आपण जबाबदार लोकप्रतिनिधी…

मुंबईः शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी मुंबईत वाहतूक शाखेच्या (Mumbai Traffic Police) पोलिसांबाबतचा त्यांना आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला. संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का याची जनतेला माहिती मिळेल! ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली??? असं कॅप्शन देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. त्याला आता मुंबई वाहतूक पोलिसांनी उत्तर दिले आहे.

महोदय, मुंबई शहरात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केलेल्या 1 कोटी 31 लाखांपेक्षा अधिक ई-चालानधील 685 कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडाची रक्कम 1 जानेवारी 2019 पासून प्रलंबित आहे. ही दंडनीय रक्कम शासन जमा करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमधे वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी शनिवार व रविवार या दिवशी दंड वसुलीची मोहिम हाती घेण्यात येते. अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणारा संदेश समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यापूर्वी आपण जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याने पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितीची माहिती घेऊन आपण संदेश प्रसारित करणे अपेक्षित होते, असा सल्लाही मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या एक्स हॅण्डलवरून दिला आहे. यावर अद्याप सरकारमधील कुणी प्रतिक्रिया दिलेली नाही.


१९८५ ला अनेक आमदार सोडून गेले, पुढच्या वेळी ते विधानसभेत दिसलेच नाहीत; पवारांचा थेट इशारा

अमोल कोल्हेंनी काय अनुभव सांगितला…

कोल्हे हे मुंबईतून बाहेर पडत होते. त्यावेळी त्यांना सिग्नलवर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी अडवलं. त्यावेळी त्यांना एक धक्कादायक अनुभव आल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत ते म्हणाले की, ‘आजचा धक्कादायक अनुभव, मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे? याची माहिती घेतली. तेव्हा त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मॅसेज दाखवला. त्या मॅसेजमध्ये म्हटलेलं होतं की, प्रत्येक चौकात 25000 रूपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे! त्यामुळे या महिला पोलिसासारखे सर्व कर्मचारी ही वसुली करत आहेत. असं कोल्हे म्हणाले.

Ananya Birla : 1500 कोटींची कंपनी खरेदी करणारी अनन्या बिर्ला कोण आहे तरी कोण?
मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये.. इतर शहरांचं काय?
त्यामुळे संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा करावा. वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का? याची जनतेला माहिती मिळेल! अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे. तर त्यांनी यावेळी या पोस्टला ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली??? असं हॅशटॅग देत सरकारवर टीका केली आहे.

तसेच पुढे कोल्हे असंही म्हणाले की, मी त्या पोलीस भगीनीचे नाव सांगणार नाही. कारण अत्यंत विश्वासाने त्यांनी ही गोष्ट मला सांगितली. पण त्या देखील म्हणाल्या की, हे अवघड आहे. तसेच एवढी वसूली झाल्याशिवाय जागा सोडायची नाही. अशा आम्हाला सूचना आहेत. असं ही महिला म्हणाली. त्यामुळे हे आदेश नेमके कोणी दिले ? असं म्हणत त्यांनी गृहखात देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारित असल्याने त्यांना टॅग केले आहे. असं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube