१९८५ ला अनेक आमदार सोडून गेले, पुढच्या वेळी ते विधानसभेत दिसलेच नाहीत; पवारांचा थेट इशारा

  • Written By: Published:
१९८५ ला अनेक आमदार सोडून गेले, पुढच्या वेळी ते विधानसभेत दिसलेच नाहीत; पवारांचा थेट इशारा

Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जत मेळाव्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह (Sharad Pawar)आमदार अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी अजित पवारांनी शरद पवारांबाबत अनेक गौप्यस्फोट केले. पवारांनी अध्यक्षपदाचा दिल्यानंतर त्यांनीच राजीनामा परत घेण्यासाठी आंदोलन करायला लावलं, अशी टीका अजित पवारांनी केली होती. या सगळ्या टीकेवर आज पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सोडून गेलेल्या आमदांना थेट इशाराही दिला.

‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाच्या आठवणींना विद्या बालनने दिला उजाळा, पोस्ट शेअर करत म्हणाली… 

अजित पवारांच्या या गौप्यस्फोटांवर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, अजित पवारांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी मला पहिल्यांदा समजल्या. काही लोकांनी नवीन प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या लोकांना आपणम मोठं केलं, तेच लोक आपल्याला सोडून गेले, अशी खंत पवारांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, पण, काही लोक सोडून गेले तरी मला त्याची फिकीर नाही. जो आपली बाजू सर्वसामान्यांसमोर मांडण्यात यशस्वी होतो, जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते. 1980 च्या निवडणुकीत माझ्या पक्षाचे साठ आमदार निवडून आले. त्यावेळी मी 15 दिवसांसाठी परदेशात गेलो असताना सत्तेच्या लालसेपोटी काही पक्षांनी माझे आमदार फोडले होते. मी परत आलो तेव्हा माझ्यासोबत फक्त सहा आमदार उरले होते. मी फक्त सहा आमदारांचा नेता होतो. 1985 च्या निवडणुकीत मी पुन्हा सहाचे साठ आमदार केले, संख्या वाढली. नुसतीच वाढली नाही तर जे पक्ष सोडून गेले होते, त्यांच्यापैकी तीन ते चार जण सोडले तर सगळेच पराभूत झाले होते, अस सांगत पवारांनी अजित गटाला इशारा दिला.

Ahmednagar : शेतकरी सातबारावरती नोंदच करत नाहीत, मदत कशी मिळणार? मंत्री विखे पाटलांचा सवाल 

पवार म्हणाले, अजित पवार यांनी एक राजकीय निर्णय घेतला आहे. तो त्यांचा हक्क आहे. ते ज्या मार्गाने जाण्याचा विचार करत होते, तो आम्हाला मान्य नव्हता. विधानसभा निवडणुकीत आम्ही जी मते मागितली ती भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. त्यावेळी आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाणे म्हणजे जनतेची फसवणूक आहे. आजही आमची भूमिका भाजपच्या विरोधात आहे, असं म्हणाले.

लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी टीका
ज्यांनी पक्ष सोडला किंवा पक्ष हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांकडून तुमच्यावर टीका केली जाते, असं विचारलं असता पवार म्हणाले की, पण याचा फारसा विचार करण्याचे कारण नाही. हे लोक जनतेत गेल्यावर जनताच यांना प्रश्न विचारेल. याची कल्पना असल्यानं लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी अशी टीका केली जाते, असं पवार म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube