Ahmednagar : शेतकरी सातबारावरती नोंदच करत नाहीत, मदत कशी मिळणार? मंत्री विखे पाटलांचा सवाल
Ahmednagar : नगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain)शेतकऱ्यांचे (Farmer)मोठे नुकसान झाले आहे. नुकताच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)यांनी नगर जिल्ह्यातील पारनेर (Parner)तालुक्याचा नुकसान पाहणी दौरा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. मात्र अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद सातबारावर केलेली नाही. यामुळे त्यांना मदत मिळण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे पंचनामे महत्त्वाचे असून प्रत्येक शेतकऱ्यांना मदत मिळावी हा शासनाचा उद्देश असल्याचं यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
आपण जर यापूर्वी इतिहासात पाहिलं तर आपण केवळ अवकाळी पावसाच्या वेळेस नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करायचो मात्र आता आपण सततच्या पावसाला देखील मदत करत आहोत. गेल्या वर्षभरात 44 हजार शेतकऱ्यांना 40 कोटी रुपयांची आर्थिक नुकसानभरपाई मिळाली. सरकार संवेदनशील आहे म्हणूनच आपण असे निर्णय घेत आहोत.
अजितदादांच्या बोलण्यात सत्यता नाही; काऊंटर फायर करत पवारांनी फेटाळले सर्व दावे
पारनेरमध्ये गारपीट झाली आपण तातडीने पंचनामाच्या आदेश दिले आहेत. आपण पंचनामे का करतो, बऱ्याच वेळा शेतकरी आपल्या पिकाची सातबाराला नोंद करत नाही, उताऱ्यावर क्षेत्राची नोंद नसेल तर आपण मदत कोणत्या भरोशावर करणार? त्यानंतर शेतकरी आम्हाला मदत मिळाली नाही, अशा समस्या घेऊन येतात. प्रत्यक्ष पंचनामे झाले किती क्षेत्र नुकसान झाले? त्यानुसार नुकसानभरपाई कशी करता येईल? याबाबत विचार केला जातो, असेही यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्यात मागील शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे 107 गावांमधील 8 हजार 571 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. त्यात मुख्यत्वे कांदा, कापूस, मका, भात यासह द्राक्षे, पेरु, डाळिंब आदी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यात सर्वाधिक नुकसान हे पारनेर आणि अकोले या दोन तालुक्यात झालं आहे. या अवकाळी पावसामुळे 10 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 25 घरांची पडझड झाली आहे. महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने हा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नोव्हेंबर महिन्यांत अवकाळी पाऊस पडण्याचे हे सलग चौथे वर्षे आहे. यामुळे आधीच दुष्काळाच्या उंबरठ्यावर असणार्या शेतकऱ्यांच्या जखमा आणखी रक्ताळ्यात आहेत. दरम्यान, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती पिक, फळबागा आणि दगावलेल्या जनावरांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.