Amol Kolhe अजित पवार गटात? शरद पवारांचं नाव घेत कोल्हेंनीच खोडला तटकरेंचा दावा

Amol Kolhe अजित पवार गटात? शरद पवारांचं नाव घेत कोल्हेंनीच खोडला तटकरेंचा दावा

Amol Kolhe : जेव्हा आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देखील सुरूवातीला अजित पवारांना समर्थन दिलं होतं. तशा आशयाचं प्रतिज्ञापत्रक देखील त्यांनी दिलं होतं, असा खळबळजनक दावा अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच स्वतः खासदार अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया देत तटकरेंचा हा दावा खोडून काढला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी मी शरद पवार साहेबांसोबत असल्याचं जाहीर केलं होतं. आजही मी त्यांच्यासोबतच आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या प्रतिज्ञापत्रातही मी पवार साहेबांसोबत असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर आधिक काही भाष्य करावं असं वाटत नाही.

Sunil Tatkare यांचा मोठा गौप्यस्फोट; अमोल कोल्हे अजित पवार गटातच; आमच्याकडे ‘ते’ प्रतिज्ञापत्र

काय म्हणाले होते तटकरे ?

2 जुलैला जेव्हा आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील सुरूवातीला अजित पवारांना समर्थन दिलं होतं. तशा आशयाचं प्रतिज्ञापत्र देखील त्यांनी दिलं होतं. तसेच सुप्रिया सुळेंनी माझ्यावर अपात्रतेची कारवाई करण्यातची मागणी केली. पण ती कारवाई कोल्हेंवर देखील व्हावी कारण त्यांनी अजित पवारांना समर्थन दिल्याचं प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळे ते आमच्यासोबतच आहेत. असं आम्ही मानतो. असं तटकरेंनी काल म्हटलं होतं.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अपात्र करण्याविषयीचे पत्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले आहे. यामध्ये त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा देखील दाखला दिला आहे. यावर बोलताना तटकरे यांनी काल अमोल कोल्हे हे अजित पवार गटातच असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर चर्चा सुरू झाल्या होत्या. निवडणुका जवळ आलेल्या असताना त्यांनी हा गौप्यस्फोट केल्याने शरद पवार गटात अस्वस्थता वाढली होती. यातून काही वेगळा संदेश जाऊ नये यासाठी स्वतः खासदार कोल्हे यांनी यावर स्पष्ट प्रतिक्रिया देत तटकरे यांचा दावा खोडून काढला.

Maratha Reservation : ‘उद्धव ठाकरेंना बैठकीचं निमंत्रणच नव्हतं..,’; सुषमा अंधारेंनी राणेंना सुनावलं

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube