Maratha Reservation : ‘उद्धव ठाकरेंना बैठकीचं निमंत्रणच नव्हतं..,’; सुषमा अंधारेंनी राणेंना सुनावलं

Maratha Reservation : ‘उद्धव ठाकरेंना बैठकीचं निमंत्रणच नव्हतं..,’; सुषमा अंधारेंनी राणेंना सुनावलं

उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण नव्हतं, माहिती घेऊन बोला जरा, या शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना सुनावलं आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं मनोज जरांगे यांचं उपोषण काल सुटलं. यावेळी उद्धव ठाकरे देहरादूनला मौजमजा करायला गेले असल्याची टीका नितेश राणे यांनी केली होती. त्यावर बोलताना अंधारेंनी राणेंना सुनावलं आहे.

‘दादां’वरील आरोपांनंतर बोरवणकरांचं विमान तिकीट अन् निमंत्रणही रद्द; आपच्या नेत्याची पोस्ट

सुषमा अंधारे म्हणाल्या, मला भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर बोलायला आवडत नाही, पण अल्पबुद्धी लोकं असतील तर त्यांनी शिक्षक म्हणून समजून समजवलं पाहिजे, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत. राज्य जळत सताना त्यांना राज्यात राहणं गरजेचं आहे, दुसऱ्या राज्यात प्रचार करणं गरजेचं नसल्याचं अंधारे म्हणाल्या आहेत.

Lok Sabha Election : 2024 साठी खडसेंची मोठी घोषणा! तिकीट मिळाल्यास रावेरमधून लढणार

तसेच उद्धवसाहेब सत्तेतील कुठल्याही पदावर नाही. उद्धव ठाकरे यांना सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रणही देण्यात आलेलं नव्हत. मनोज जरांगे यांचं उपोषण आता सुटलेलं आहे. शाऊटींग ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला हे माहित नाही की, सर्वपक्षीय बैठकीचं ठाकरेंना निमंत्रणचं नव्हतं, त्यांनी माहिती घेऊन बोललं पाहिजे नितेश राणे आणि अभ्यास असं काही अपेक्षा करु नये, अशी बोचरी टीकाही सुषमा अंधारे यांनी यावेळी केली आहे.

कर्नाटकातील ऊस पोलीस बंदोबस्तात आणण्यासाठी पोलिसांना ठेका, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

काय म्हणाले होते नितेश राणे?
काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसोबत खाजगी विमानातून देहादूनला निघून गेले. राज्यात एकीकडे मराठा आरक्षण सुरु असताना देवेंद्र फडणवीस दिल्लीला प्रचाराला कसे जातात? असे प्रश्न ठाकरे विचारत होते, कामगारांकडून अग्रलेख लिहुन घेत होते, आता महत्वाचं उपोषण सोडून कुटुंबासोबत मौजमजा करायला जात असल्याची टीका निलेश राणे यांनी केली होती.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले उपोषण मनोज जरांगे यांनी काल नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. 2 जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास 3 जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज