Sunil Tatkare यांचा मोठा गौप्यस्फोट; अमोल कोल्हे अजित पवार गटातच; आमच्याकडे ‘ते’ प्रतिज्ञापत्र

Sunil Tatkare यांचा मोठा गौप्यस्फोट; अमोल कोल्हे अजित पवार गटातच; आमच्याकडे ‘ते’ प्रतिज्ञापत्र

Sunil Tatkare : अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. की, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्या विरोधात करावाई करण्यात यावी. तसेच यावेळी तटकरेंनी एक गौप्यस्फोट देखील केला आहे.

‘अदृश्य शक्तीच्या जीवावर देशात खेळ चाललायं’; सुप्रिया सुळेंचा घणाघात

अमोल कोल्हे अजित पवार गटातच…

तटकरेंनी यावेळी बोलताना म्हटले की, 2 जुलैला जेव्हा आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील सुरूवातीला अजित पवारांना समर्थन दिलं होतं. तशा आशयाचं प्रतिज्ञापत्रक देखील त्यांनी दिलं होतं. तसेच सुप्रिया सुळेंनी माझ्यावर अपात्रतेची कारवाई करण्यातची मागणी केली. पण ती कारवाई कोल्हेंवर देखील व्हावी कारण त्यांनी अजित पवारांना समर्थन दिल्याचं प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळे ते आमच्यासोबतच आहेत. असं आम्ही मानतो. असं तटकरेंनी म्हटलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

Prithvik Pratap: पृथ्वीक प्रतापने मुंबईत खरेदी केले नवीन आलिशान घर; फोटो शेअर…

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अपात्र करण्याविषयीचे पत्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले आहे. यामध्ये त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा देखील दाखला दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

आदरणीय ओम बिर्ला जी, मी 4 जुलै 2023 रोजी भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत सुनील तटकरे यांना अपात्र ठरवण्यासाठी अपात्रता याचिका दाखल केली होती. मात्र चार महिने उलटून देखील त्या याचिकेवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दरम्यान एका दोषी खासदाराने अशा प्रकारे पदावर राहणे म्हणजे दहाव्या अनुसूचीच्या नियमाचं उल्लंघन आहे. असं देखील सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube