Chandra Barot, director of Amitabh Bachchan’s Don, passes away; breathed his last at the age of 86 : ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचं निधन झालं आहे. त्यांनी मुबईमध्ये वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते 1978 साली आलेल्या बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रचंड गाजलेल्या डॉन या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.
ठाकरे बंधुंच्या युतीची चाहूल, शिंदेंचा आधीच मास्टरस्ट्रोक; मनसेचा ‘हा’ नेता हाती घेणार धनुष्यबाण
चंद्रा बारोट यांच्या पत्नी दिपा यांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, ते गेल्या सात वर्षांपासून पल्मोनरी फायब्रोसिसशी या आजाराशी झुंजत होते. त्यासाठी ते गुरूनानाक रूग्णालयात उपचार देखील घेत होते. तेथील डॉक्टक मनिष शेट्टी हे त्यांच्यावर उपचार करत होते. त्यानंतर आता त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. असं दिपा म्हणाल्या.
पाच वर्षांनी होणार ‘त्या’ 100 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी; मंत्री मंगलप्रभात लोढांची मोठी घोषणा!
दरम्यान चंद्रा बारोट यांच्या डॉन चित्रपटाच्या दिग्दर्शनाबाबत सांगायचं झालं तर त्यांचा हा चित्रपट अमिताभ बच्चन यांची ओळख डॉन अशी करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. तसेच या चित्रपटाची छाप प्रेक्षकांच्या मनावर आजही कायम आहे. यामध्ये त्यांना त्यांचे मित्र आणि सिनेमेटोग्राफर नरीमन इराणी यांनी मोठी मदत केली होती. दरम्यान बारोट हे दिग्दर्शनामध्ये उतरण्यापुर्वी टांझानिया देशातून परतले होते. तेथे झालेल्या वांशिक अशांततेमुळे त्यांना यावं लागलं होतं.