Chhaava box office collection Day 16 : 2025 चा पहिला बॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपट छावा (Chhaava Movie) आहे. छावा हा विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला (Bollywood News) आहे . छावा तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असताना, चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे. ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कच्या अहवालानुसार चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तिसऱ्या शनिवारी, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 65.38 टक्क्यांची वाढ झाली. त्याने 21.75 कोटी रुपये कमावले.
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
भारतात चित्रपटाचे निव्वळ कलेक्शन 434.25कोटी रुपये आहे. जगभरात चित्रपटाने 566.5 कोटी रुपये कमावले आहेत. दमदार प्रदर्शनामुळे छावा अलीकडील ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कलेक्शनला मागे टाकण्यास सज्ज असल्याचे (Chhaava Box Office Collection) दिसते. विकी कौशलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंवर यासंदर्भात स्टोरी टाकली आहे. ज्यामध्ये आपल्याला चित्रपटाच्या एकूण कमाईचा आकडा पाहायला मिळतोय.
https://www.instagram.com/stories/vickykaushal09/3579287719635388624?igsh=bHBhNmd6eDB3eno=
तिसऱ्या शनिवारी छावाची एकूण प्रेक्षकांची गर्दी 28.86 टक्के (Entertainment News) होती, संपूर्ण भारतात एकूण 5616 शो झाले. चित्रपटाची सर्वाधिक गर्दी चेन्नईमध्ये होती, तिथे फक्त 36 शो होते. पुण्यात 588 शोसह 55.75 टक्के मुंबईत 1142 शोसह 42.25 टक्के, तर बेंगळुरूमध्ये 396 शोसह 37.50 टक्के, तर दिल्ली एनसीआरमध्ये छावाची गर्दी 21.25 टक्के होती, जिथे 1214 शो झालेत.
MSEDCL : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नवीन भरती, जाणून घ्या अर्ज कसा करावा
‘छावा’ हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे आणि दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सने त्याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात दिव्या दत्ता , आशुतोष राणा आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. विकी कौशलच्या चित्रपटाने तिसऱ्या शनिवारी मोठी उडी मारल्याचं समोर आलंय. जगभरातील एकूण कमाई 566 कोटींपेक्षा जास्त केली आहे.