Download App

Thangalaan : चियान विक्रमचा बॉक्‍स ऑफिसवर धमाका; दुसऱ्याच दिवशी ‘थंगालन’ ची तुफान कमाई

Thangalaan Box Office Collection Day 2: चियान विक्रमचा (Chian Vikram) चित्रपट 'थंगालन' हा 2024 चा बहुप्रतिक्षित चित्रपट होता.

Thangalaan Box Office Collection Day 2: चियान विक्रमचा (Chian Vikram) चित्रपट ‘थंगालन’ (Thangalaan Movie) हा 2024 चा बहुप्रतिक्षित चित्रपट होता. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या इतर अनेक चित्रपटांच्या तुलनेत ‘थंगालन’ला (Box Office ) खडतर स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. असे असूनही चियान विक्रमच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली होती. या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी किती कलेक्शन केले आहे, चला तर मग जाणून घेऊया?

दुसऱ्या दिवशी किती व्यवसाय केला?

15 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर मोठा संघर्ष झाला होता. ‘स्त्री 2’, ‘खेल खेल में’ आणि ‘वेदा’ बॉलीवूडमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले, तर दक्षिणेकडील डबल ई-स्मार्ट, मिस्टर बच्चन, वझा आणि थंगालन यासह 8 चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. बॉलीवूडमधील ‘स्त्री 2’ बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत असताना, दक्षिण चित्रपटांमधील ‘टांगलान’ प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. चित्रपटाने चांगली ओपनिंग घेतली. मात्र, दुसऱ्या दिवशीही ‘थंगालन’च्या कमाईत घट दिसून येत आहे. चियान विक्रमच्या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, ‘थंगालन’ने पहिल्या दिवशी 13.3 कोटी रुपयांचे खाते उघडले आहे. आता चित्रपटाच्या कमाईचे आकडे रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आले आहेत.

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘थंगालन’ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह ‘थंगालन’ची दोन दिवसांत एकूण कमाई 17.30 कोटी रुपये झाली आहे.

20 कोटींपासून थोडा दूर

दुस-या दिवशी ‘थंगालन’च्या कमाईत घट झाली असली तरी या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 15 कोटींचा आकडा पार केला असून आता 20 कोटींचा आकडा गाठण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. वाढलेल्या वीकेंडचा चित्रपटाला फायदा होईल आणि त्याची कमाई वाढेल अशी आशा निर्मात्यांना आहे. आता हा चित्रपट वीकेंडला कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे.

Thangalaan OTT: आता ओटीटीवर दिसणार ‘थंगालन’चा थरार; कधी अन् कुठे पाहता येईल चित्रपट?

‘थंगालन’ ही पीरियड ॲक्शन गाथा

पा. रंजित दिग्दर्शित, ‘थंगालन’ हा एक कालखंडातील ॲक्शन गाथा आहे ज्यामध्ये पौराणिक घटकांसह ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. चित्रपटाची कथा 1850 च्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. चित्रपटाची कथा त्यावेळची आहे जेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आदिवासींच्या एका गटाला सोन्याची खाण शोधण्यासाठी कोलार गोल्ड फील्ड्स नावाच्या ओसाड भागात पाठवले होते. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर चियान विक्रम व्यतिरिक्त मालविका मोहनन, पार्वती थिरुवोतू आणि पशुपती मुख्य भूमिकेत आहेत.

follow us