Chinmay Mandlekar: अभिनेता चिन्मय मांडलेकरचं (Chinmay Mandlekar) एक नवं कोरं मराठी नाटक देखील चाहत्यांच्या भेटीला लवकरच येणार आहे. (Theatre) चिन्मयचं गालिब हे नाटक चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे. (Social media) या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरनं यांनी केलं आहे. या नाटकात नेमकं काय काम करणार आहे? तसेच नाटकाचा प्रयोगाची तारीख काय असणार आहे?
या नाटकामध्ये गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी,अश्विनी जोशी, गुरुराज अवधानी हे कलाकार गालिब मुख्य भूमिका साकारणार आहेत. गालिब या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग हा आज (5 नोव्हेंबर ) ठाण्यामधील गडकरी रंगायत या ठिकाणी पार पडणार आहे. तसेच पुण्यात 11 नोव्हेंबर दिवशी या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.
मुंबईमधील प्रयोग रविवार 5 नोव्हेंबर दु. 4:30 वाजता गडकरी रंगायत, ठाणे या ठिकाणी होणार आहे. तर सोमवार 13 नोव्हेंबर दु. 4 वा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले, शनिवार 18 नोव्हेंबर दु. 4 वा. यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, आणि रविवार 19 नोव्हेंबर दु. 4 वा. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली पार पडणार आहे. पुण्यातील प्रयोग शनिवार 11 नोव्हेंबर दु. 12:30 वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड या ठिकाणी तर शनिवार 11 नोव्हेंबर सायं. 5: 30 वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पार पडणार आहे.
याबद्दल चिन्मयनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत गालिब या नाटकाच्या प्रयोगाची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यानं सांगितले आहे की, “तुझ्या डोळ्यात मांजराची धिटाई आणि हरणाचं बावरलेपण दोन्ही आहे.” मराठी रंगभूमी दिनी, अर्थात 5 नोव्हेंबर दिवशी येत आहे नवीन नाटक-गालिब” सनी, द कश्मीर फाइल्स , पावनखिंड, शेर शिवराज यांसारख्या सिनेमामधून चिन्मय प्रेक्षकांच्या कायम भेटीला आला. तसेच चिन्मयच्या सुभेदार या सिनेमानं देखील चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आता चिन्मयच्या गालिब या नाटकाची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. या नाटकामधील कलाकारांचा अभिनय बघण्यास प्रेक्षक मोठ्या प्रमाणात उत्सुक झाले आहेत.