Thackeray Vs Shinde : संजय राऊत, शरद पवार यांच्यावर आरोप, सोशल मिडियावर मिम्सचा धुमाकूळ, नेटकरी म्हणतात…
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. या निणर्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीका करण्यापासून सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आला आहे.
भाजपच्या अकौंटवरून टोला
या निकालानंतर भाजपच्या ट्विटर अकौंटवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांचा फोटो ट्विट करत ‘काम फत्ते’ असे कॅप्शन दिले आहे.
या फोटो मध्ये Yes We Did It असं लिहलं असून सोबत संजय राऊत आणि शरद पवार यांचा फोटो आहे.
ट्विटरवर पाब्लो नावाच्या एका युजर्सकडून देऊन चित्रपटातील एका दृश्याचा दाखल देत एक मिम शेअर केला आहे. “कोण कुठला तू, तुला माया फुटली रं पोरा” असं लिहीत एक मिम शेअर केला आहे.
शरद पवार-संजय राऊत यांच्यावर निशाणा
सोशल मीडियावरच्या या अनेक मिममध्ये संजय राऊत आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. लाल केसांचा शार्क या युजर्सने देखील असाच एक फोटो शेअर करत राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
या फोटोमध्ये संजय राऊत काम फत्ते असं शरद पवार यांना काम फत्ते केल्याचं सांगत असल्याचं दाखवलं गेलं आहे.
भाजप नेत्यांकडूनही खिल्ली
निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर भाजप नेत्यांकडून या निर्णयावर ठाकरे गटावर जोरदार ट्विट करत ठाकरे यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती निलेश राणे यांच्या ट्विटची.
निलेश राणे यांनी सलग काही ट्विट करत ठाकरे यांची खिल्ली उडवली. यात त्यांनी स्वतः आपल्या हसण्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. जी सोशल मीडियावर मोठा प्रमाणात व्हायरल झाला.
Pls forward this smiling face to UT n his baby penguin..
Kyunki mujhe block Kiya hoga..Control nahi hota hai 😂🤣 pic.twitter.com/WVENFOFguf
— Nitesh Rane (@NiteshNRane) February 17, 2023
आणखी एक भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो शेअर करत “फेब्रुवारीत सरकार कोसळणार होत” असं कॅप्शन लिहिलं संजय राऊत यांना टोला लगावला आहे. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी हे सरकार फेब्रुवारी मध्ये कोसळणार असं म्हटलं होत.
फेब्रुवारीत सरकार कोसळणार होतं… pic.twitter.com/eaUpbUAYgL
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 18, 2023