Phulwa Khamkar Special Post for Rahi Barve : ‘तुंबाड’ या कलात्मक चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Barve) यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तक ‘श्वासपाने’ ला नुकताच “मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा” प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर (Tumbbad Movie) झाला आहे. 126 वर्षांची परंपरा लाभलेल्या या संस्थेने राहीच्या लेखनाचा सन्मान केल्याने साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या आनंदाच्या क्षणी राहीची सख्खी बहीण, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर (Phulwa Khamkar) हिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहून आपल्या भावाबद्दलचा अभिमान व्यक्त केला आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
…म्हणून विरोधक मंगळसूत्र चोर म्हणतात; पडळकरांच्या खास मित्राने सांगितली ‘ती’ घटना
आता नाम नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर हिने तिचा सख्खा भाऊ (Entertainment News) आणि तुंबाड या गाजलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक राही बर्वे याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. राही बरोबरच्या श्वासपाने या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने तिने मनोगत व्यक्त केलंय.
या पोस्टमध्ये फुलवाने म्हटलंय की, प्रिय राही
तुझ्या श्वासपाने या आत्मचरित्राला 126 वर्षांची परंपरा असलेल्या ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने’ पारितोषिक जाहीर केलंय. याहून मोठी आणि आनंदाची बातमी ती काय? इतक्या मोठ्या संस्थेने तुझ्या लिखाणाचा सन्मान करणे यापेक्षा अधिक काय हवे? खूप खरं, तळमळीने लिहिलेलं, सुंदर पण जीवाला चटका लावून जाणारे आत्मचरित्र. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी लिहिलेलं. मी रडत , थांबत पूर्ण केले, त्या सर्वांची साक्षीदार असून पण मी कधीच तुझ्याबरोबर नव्हते. आपल्याच व्यापात, कामात , संसारात गुरफटले होते याची जाणीव वाचताना पदोपदी होत होती. आपण आपल्या माणसांसाठी सुद्धा किती वेळा उपलब्ध नसतो हे प्रखर सत्य जाणवत होते, त्याचा एक वेगळाच त्रास झाला, असो!
तुंबाडनंतर सुद्धा तुझा स्ट्रगल अजून सुरूच आहे. तो तू अत्यंत खंबीरपणे आणि कसोशीने करतो आहेस, याहून उत्तम उदाहरण आत्ताच्या पिढीसाठी काय असू शकते? तुझ्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल विचारणा करणाऱ्यांना तुझा पुढचा प्रवास पुढे मागे नक्कीच सांग. तेव्हा तुझ्याबद्दल त्यांचा आदर अजून वाढेल हे नक्की.
तुंबाडच्या दिग्दर्शनात स्वतःचा हक्क सांगणाऱ्या लोकांना शांत राहून उत्तर देणं, ही गोष्ट हल्ली सर्वांना नाही जमत. जरा काही वाचलं आणि पटलं नाही की, त्यावर तोंडसुख घेणारे खूप असतात. पण आपण आपल्या कामातून बोललेलं चांगलं म्हणून शांत राहणारे हाताच्या बोटावर मोजणारे. सोशल मिडियाच्या या जगात अशा पध्दतीने सुद्धा काम करता येतं, हे तू दाखवून देत आहेस. तुला समजून घ्यायचं असेल त्याने प्रत्येकाने ‘श्वासपाने’ वाचलं पाहिजे. त्यांना राही हे रसायन थोडे तरी कळेल. आज आईला तुझा खूप खूप अभिमान वाटला असता. खूप खूप छान काम कर …..